आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी… आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी या अपात्रता प्रकरणावर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं? याबाबत ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला नोटीस पाठवण्यात आली आहे. अजित पवारांना विचारलं आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये, असं या नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवेळी काय घडलं? याची माहिती ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे. शिवसेनेचे आमदार प्रकरण सोबत एनसीपीचे प्रकरण सुनावणीसाठी येईल. पण भरत गोगावले यांनी मुंबई हासकोर्टात ६ ॲागस्ट तारीख घेतलीय. जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावं लागेल. सप्टेंबर अखेर पर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना प्रकरण लांबवायचं आहे. म्हणून ते हायकोर्टात गेले आहेत, असं ॲड. सिद्धार्थ शिंदे म्हणाले आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रकरणं एकत्र ऐकतो, असं सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीवेळी म्हटलं आहे. आज राष्ट्रवादीतील आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी होती. यावेळी दोन्ही प्रकरण एक सारखी आहेत. त्यामुळे ही सुनावणी आम्ही एकत्र ऐकू, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा समोर आला होता. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या विरोधात तर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या दोन्ही पक्षांची सुनावणी आता यापुढे एकत्र होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालायत सुनावणी झाली. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांना अपात्र करण्याची शरद पवार यांच्या पक्षाची याचिका आहे. यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड दिल्लीत आहेत. ते या सुनावणीला उपस्थित होते.