नवी दिल्ली | 09 सप्टेंबर 2023 : इंग्रजीत जेव्हा आपल्या देशाचं नाव लिहिलं जातं तेव्हा ते India असं लिहिलं जातं. अगदी संविधानापासून ते विविध संस्था आणि सामान्यांच्या बोलण्यातही हा शब्द सराईतपणे येतो. मात्र यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. येत्या 18 सप्टेंबरपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. 22 सप्टेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात नेमके कोणते मुद्दे मांडण्यात येणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यात महत्वाचे मुद्दे मांडले जाणार असल्याचं बोललं जाणार आहेत. यातच इंडिया हे नाव न वापरता इंग्रजीत लिहितानाही भारतच लिहिलं जावं, असा प्रस्ताव आणला जाईल, अशी चर्चा आहे. याच चर्चेला दुजोरा देणारी एक पाटी आज G-20 परिषदेत दिसली.
G-20 परिषदेची आज बैठक होत आहे. या बैठकीसाठी जगभरातील विविध देशांचे प्रमुख आज राजधानी दिल्लीत आलेत. या G-20 परिषदेला सुरुवात झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-20 च्या बैठकीत प्रस्तावना केली. ही प्रस्तावना करत असताना नरेंद्र मोदी यांच्या समोर देशाच्या नावाची पाटी लावण्यात आली होती. यात मोठा बदल दिसला इथून मागे इंडिया असं लिहिलेलं दिसायचं. मात्र यावेळी भारत असं लिहिलेलं दिसलं. यामुळे मोदी सरकार खरंच असा काही बदल करण्याच्या तयारीत आहे का? अशी चर्चा होऊ लागली आहे.
देशाची सार्वत्रिक लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर देशातीत प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी झाली आहे. या आघाडीला इंडिया नाव देण्यात आलं आहे. यातून ही आघाडी देशव्यापी आणि देशाच्या सार्वभौमत्वाला सामावून घेणारी आहे, असं दाखवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. विरोधकांच्या याच मनसुब्यांना उधळून लावण्यासाठी मोदी सरकार हा बदल करणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र येत्या संसद अधिवेशनात या बाबतचं सत्य समोर येईल.
आजपासून G-20 शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. जगभरातील महत्वाचे नेते आज दिल्लीत आहेत. या G-20 परिषदेला काही वेळाआधी सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपामध्ये या नेत्यांचं स्वागत केलं. साडेदहा वाजता वन अर्थ हे पहिलं सत्र सुरू झालं आहे.