MIM : शरद पवार, राहुल गांधी यांना मुस्लिम मतं हवीत, पण इम्तियाज जलील नकोय; इम्तियाज जलील आक्रमक

| Updated on: Sep 21, 2023 | 3:26 PM

MIM MP Imtiyaz Jaleel on Sharad Pawar Rahul Gandhi : आगामी लोकसभा निवडणुका, शरद पवार, राहुल गांधी यांना टोला अन् शहरांचं नामांतर; एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. जलील यांनी आगामी लोकसभा निवडणूक आणि इंडिया आघाडीवरही भाष्य केलंय.

MIM : शरद पवार, राहुल गांधी यांना मुस्लिम मतं हवीत, पण इम्तियाज जलील नकोय; इम्तियाज जलील आक्रमक
Follow us on

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आहेत. शिवाय त्यानंतर लगेच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूकही होणार आहे. या पार्श्वभूमीवर समविचारी पक्षांची आघाडी होत आहे. भाजप आणि मित्र पक्षांची एनडीए आघाडी आहे. तर विरोधी पक्षांची इंडिया आघाडी आहे. अशात एमआयएमची भूमिका काय असेल. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य केलं आहे. एमआयएम पुढच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. कोण सोबत आलं तर सोबत घेऊ. अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणूक लढू, असं इम्तियाज जलील म्हणालेत. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

शरद पवार, राहुल गांधी यांना मुस्लिम मतं हवी आहेत. मात्र त्यांच्या बाजुला बसलेला इम्तियाज जलील त्यानं नको आहे. भाजपला पराभूत करायचं असेल तर आम्हाला कमजोर समजू नका. आमची पण ताकद आहे. इंडिया आघाडीत जे पक्ष घेतले त्यांची ताकद नाही. पण आम्हाला मानणारा मोठा वर्ग आहे, असं इम्तियाज जलील म्हणालेत.

औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यात आलं आहे. त्यावरही इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा सरकारकडे काही नसतं तेव्हा शहरांची नावं बदलली जातात. शहरांची नावं बदलून तुम्ही काय साध्य करणार आहात? आमच्याकडे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री विमानाने आले आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घोषणा करुन गेले, असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीवर इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या संसदेचं विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध विधेयकं मांडली जात आहेत. यात महिला आरक्षण विधेयकही मांडलं गेलं आहे. लोकसभेत याला मंजुरी मिळाली आहे. तर राज्यसभेत या विधेयकावर आज चर्चा सुरु आहे. मतदानावेळी या विधेयकाला काल दोन नेत्यांनी पाठिंबा दिला नाही. असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. यावरही जलील यांनी आपलं मत मांडलं. सध्या घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात चाललं आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, हेच कळत नाही. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यात आलं आहे, असं इम्तियाज जलील म्हणालेत.