संसदेत गोंधळ का झाला?; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले नवीन संसदभवन…

| Updated on: Dec 14, 2023 | 10:10 AM

Sanjay Raut on Parliament Confusion : संसदेत गोंधळ का झाला?; ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया... संजय राऊत नेमकं काय म्हणाले? संसदेची नवी इमारत कशी? संसदेतील गोंधळावर बोलताना राऊतांनी अजित पवारांना टोला का लगावला? वाचा सविस्तर...

संसदेत गोंधळ का झाला?; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले नवीन संसदभवन...
Follow us on

संदिप राजगोळकर, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : हिवाळी अधिवेशन सुरु असताना काल संसदेत गोंधळ पाहायला मिळाला. दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसत असलेल्या बाकांवर उडी घेतली अन् लोकसभेत एकच गोंधळ उडाला. यानंतर संसदेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आताची वास्तू संसदभवन वाटतच नाही. संसदेची नवीन इमारत माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

“नवी संसद इमारत…”

नवी संसद माझ्या दृष्टीने अधिक असुरक्षित आहे. जुनी संसद मात्र अधिक सुरक्षित होती. संसदेत जाताना एक फिल यावा लागतो तो तिथं येत नाही. मला जुन्या संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रसाद, नेहरू बसलेले दिसत होते. इथं तसं काही दिसत नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

“आता जनतेला समजलं…”

या देशात सुरक्षेच्या नावाने बोंब आहे. सीमा, सीमावर्ती राज्य, लोक आणि आता काल संसद… सरकारची आता वाचा गेली आहे. सरकार मुक आणि बधीर झालं आहे. ते निवडणूक प्रचार आणि शपथविधी यात व्यस्त आहेत. आता जनतेला समजलं असेल की हे सरकार किती तकलादू पायावर उभं आहे… आता जनतेला समजलं असेल जम्मू काश्मीर, लढाख, म्यानमार मधे अतिरेकी कसे घुसतात, असं राऊत म्हणाले.

अजित पवारांना टोला

काल त्या तरुणांनी गॅलरीतून उड्या मारल्या. कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था भेदून कुठंही जाऊ शकतं हे काल दिसलं. ज्या तरुणांना पकडलं. त्यांचा मार्ग चुकीचा… त्यांनी मांडलेल्या भावना देशाच्या होत्या. त्यांना वडे तळायला देखील कुठ जागा नाही. त्यातील एक मुलगी PHD करत आहे. तिला अजित पवार यांनी मार्गदर्शन करावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

काल जे झालं ही अराजकाची सुरुवात आहे. त्यांच्या दृष्टीने ही क्रांती आहे आमच्या दृष्टीने हा अतिरेक आहे. या तरुणांकडून झालेला अतिरेक देशासाठी घातक आहे. त्यांचं समर्थन आजिबात नाही, असं संजय राऊतांनी म्हटलंय.