‘मला नक्षली बनायचे नव्हते…’ 14 लाखांचे इनाम नावावर असलेल्या महाराष्ट्राच्या सजंतीची अनोखी कहाणी

| Updated on: Sep 08, 2024 | 5:37 PM

नक्षलवाद्यांचा सरकारशी सतत संघर्ष सुरु असतो. जेथे स्वातंत्र्याच्या सुर्याची किरणे पोहचलीच नाहीत अशा आदिवासी दुर्गम वस्तीतूनच नक्षली जन्माला येत असतात. साजंतीची कहाणी मात्र वेगळी आहे....

मला नक्षली बनायचे नव्हते... 14 लाखांचे इनाम नावावर असलेल्या महाराष्ट्राच्या सजंतीची अनोखी कहाणी
Naxali Sajanti arrested from Madhya Pradesh
Follow us on

‘मला नक्षली बनायचे नव्हते…’ मध्य प्रदेशातील परसाटोला चिचरंगपूरच्या जंगलातून सहा सप्टेंबर रोजी अटक केलेल्या एका नक्षली महिनेने हे वक्तव्य केले आहे. या नक्षली महिलेवर एकूण 14 लाखांचे इनाम घोषीत केले आहे. एक महिला जिला नक्षली बनायचे नव्हते, तिला या रक्तरंजित क्षेत्रात शिरकाव करावा लागला आणि आपल्या जीवनातील तब्बल 32 वर्षांहून अधिक काळ तिला या पोलीसांचा ससेमिरा, गोळीबार, हल्ले आणि मृत्यूचा पाठलाग सुरु असणारा जीवघेणा प्रवास आणि एके दिवशी मृत्यूनेच होणारा शेवट हा भयानक प्रवास करण्यासाठी तिला का मजबूर केले गेले याची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे.

काही जण स्वत:वरील अन्यायामुळे नक्षली बनतात. तर काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे तर काही जण आपल्याला कोणीतरी घाबरले पाहीजे म्हणून या नक्षली क्षेत्रात प्रवेश करतात. मध्य प्रदेशातील चिचरंगपूरच्या जंगलात वेगवेगळ्या राज्यांनी तिच्या नावावर 14 लाखांचे इनाम घोषीत केले होते. त्या महाराष्ट्रातील सजंती हिला अटक झाली आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली तर वेगळीच कहाणी समोर आली, सजंतीला नक्षली व्हायचं नव्हतं. परंतू तिला जबरदस्तीने या क्षेत्रात ढकल्यात आल्याचे ती म्हणते. नक्षल दलममध्ये सामील होण्यामागे अनेक कारणे असतात. परंतू तिला जबरदस्तीने नक्षली दलममध्ये सामील केले गेले. बालाघाटचे आयजी संजय सिंह यांनी या संदर्भात माहिती सांगितली.

सजंती हीने पोलिसांना चौकशीत सांगितले की तिला आई-वडील नाहीत, आणि दोन बहिणी आणि एक भाऊ आहे.साजंती तिन्ही भावंडात सर्वात मोठी आहे.साजंती हीला नक्षली व्हायचे नव्हते. परंतू नक्षल्यांनी जबरदस्तीने तिला स्वत: सोबत नेले आणि तिच्याकडून ते करवून घेतले ते तिला करायचे नव्हते.

2011 मध्ये CPIM जॉईंट केले

महाराष्ट्राच्या राज्य गडचिरोलीत राहणाऱ्या सजंती हीने साल 2011 मध्ये नक्षल्यांनी सीपीआयएम पार्टी जॉईंट केली होती. तिला साल 2016 मध्ये एमएमसी झोन पाठविले गेले. तेव्हापासून केबी डिव्हीजन काम करत होती. या नक्षली महिलेवर एकट्या मध्य प्रदेशातच सहा केस दाखल आहेत. यातील एक केस मालखेडी गावात नक्षल्यांची माहिती खबरी म्हणून दिल्याच्या संशयातून गावकऱ्याची हत्या झाल्याची आहे. यात साजंती हीचा सहभाग होता. सजंतीवर मध्य प्रदेशात 3, छत्तीसगड 5 आणि महाराष्ट्र 6 लाखांचे इनाम घोषीत केले होते.

नक्सली चकमकीत पतीचा मृत्यू

सजंतीचा पती गणेश देखील नक्षली होता. गणेश नक्षली दलममध्ये सामील झाला होता. साल 2021-22 मध्ये जामशेरा वन चौकीमध्ये पोलिस आणि नक्षल्यांत झालेल्या चकमकीत पती गणेश ठार झाला होता.साजंतीचे प्रशिक्षण ठांडा एरियात झाली होती. तिला ट्रेनिंग देणारा नक्षली पहाड सिंह होता. याच पहाड सिंह याच्या देखरेखीत सजंती हीने आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते. जसे ट्रेनिंग पूर्ण झाले तसे त्याने सजंतीला साल 2016 मध्ये केबी डिव्हीजनमध्ये पाठविले. तेव्हापासून ती येथे सक्रीय होती.