Delhi NDA Meeting | विरोधी पक्षांच्या एकजुटीला हरवायचंय, पंतप्रधान मोदी यांनी बोलावली बैठक

| Updated on: Jul 18, 2023 | 5:54 PM

विरोधी पक्षांची आज कर्नाटकच्या बंगळुरु येथे आज दुसरी बैठक पार पडल्यानंतर आता सत्ताधारी पक्षांच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सत्ताधारी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.

Delhi NDA Meeting | विरोधी पक्षांच्या एकजुटीला हरवायचंय, पंतप्रधान मोदी यांनी बोलावली बैठक
Prime Minister Narendra Modi
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : विरोधी पक्षांची आज कर्नाटकच्या बंगळुरु येथे आज दुसरी बैठक पार पडल्यानंतर आता सत्ताधारी पक्षांच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत सत्ताधारी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. भाजपकडून एनडीएची आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशोका हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. या बैठकीत महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचं काका-पुतण्याचं राजकारण बघायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार कुटुंबातील एका व्यक्तीने विरोधी पक्षांच्या बैठकीत हजेरी लावलीय, तर दुसऱ्या व्यक्तीने सत्ताधारी पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली आहे. काका-पुतण्याच्या या भूमिकांमध्ये वेगळं काही राजकारण तर नाही ना? अशी देखील चर्चा आता दबक्या आवाजात सुरु आहे.

या बैठकीसाठी महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार तर आरपीआयच्या वतीने केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे बैठकीसाठी उपस्थित आहेत. याशिवाय दुसरे दोन घटक पक्षांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये आमदार विनय गोरे आणि आमदार बच्चू कडू यांचा समावेश आहे.

एनडीएच्या या बैठकीचं एकूण 38 राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यापैकी 24 राजकीय पक्षांचा लोकसभेत एकही खासदार नाही. 7 पक्षांचे प्रत्येकी 1 खासदार तर उर्वरित 2 पक्षांचे 2 खासदार बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत 2024 च्या लोकसभेची रणनीती ठरणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

प्रत्येकाला बोलण्यासाठी आठ ते दहा मिनिटांचा वेळ

या बैठकीत प्रत्येकाला बोलण्यासाठी आठ ते दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या बैठकीत काही मागण्या करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुका एकत्रितच लढणार आणि आम्ही 45 पेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येणार असा दावा एकनाथ शिंदे यांनी बैठकीपूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केला होता. त्यामुळे राजकीय पक्षांच्या दृष्टीने ही एनडीची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

काका-पुतण्याचं राजकारण

विशेष म्हणजे या बैठकीतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार हे एनडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल आहेत. तर त्यांचे काका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बंगळुरुत विरोधी पक्षांच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे पवार कुटुंबातील दोन सदस्या दोन वेगवेगळ्या बैठकीत उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे.