नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत आजही कोरोना बाधितांच्या संख्येत 12574 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 73 हजार 790 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 45 दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निचांकी आकड्यांवर गेली आहे. कालच्या दिवसात 3 हजार 617 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे (New 173790 Corona Cases in India in the last 24 hours)
गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 617 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 84 हजार 601 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 77 लाख 29 हजार 247 वर गेला आहे. देशात 2 कोटी 51 लाख 78 हजार 011 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 22 हजार 512 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 22 लाख 28 हजार 724 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 20 कोटी 89 लाख 02 हजार 445 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,73,790
देशात 24 तासात डिस्चार्ज – 2,84,601
देशात 24 तासात मृत्यू – 3,617
एकूण रूग्ण – 2,77,29,247
एकूण डिस्चार्ज – 2,51,78,011
एकूण मृत्यू – 3,22,512
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 22,28,724
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 20,89,02,445
India reports 1,73,790 new #COVID19 cases, 2,84,601 discharges & 3,617 deaths in last 24 hrs, as per Health Ministry
Total cases: 2,77,29,247
Total discharges: 2,51,78,011
Death toll: 3,22,512
Active cases: 22,28,724Total vaccination: 20,89,02,445 pic.twitter.com/NgfUAOgz08
— ANI (@ANI) May 29, 2021
New 173790 Corona Cases in India in the last 24 hours
संबंधित बातम्या :
लसीकरणावरुन विरोधकांचे मोदी सरकारला सवाल, नीती आयोगाकडून 7 प्रश्नांची उत्तरं
“खोकला, शिंकणे किंवा बोलल्यानं कोरोना हवेत पसरतो”, केंद्राने नियमावली बदलली, वाचा नवे नियम