नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार (Corona Cases in India) पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात 24 तासाच्या कालावधीत तीन लाखांपेक्षा कमी नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तरी आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 67 हजार 334 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा काहीसा धडकी भरवणारा आहे. कारण एका दिवसात तब्बल 4 हजार 529 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. हा एका दिवसातील कोरोनाबळींचा विक्रम आहे. (New 267334 Corona Cases in India in the last 24 hours)
24 तासातील आकडेवारी
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 67 हजार 334 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 529 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 89 हजार 851 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
आतापर्यंतची आकडेवारी
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 54 लाख 96 हजार 330 वर गेला आहे. देशात 2 कोटी 19 लाख 86 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 83 हजार 248 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 32 लाख 26 हजार 719 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 18 कोटी 58 लाख 9 हजार 302 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी
देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,67,334
देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,89,851
देशात 24 तासात मृत्यू – 4529
एकूण रूग्ण – 2,54,96,330
एकूण डिस्चार्ज – 2,19,86,363
एकूण मृत्यू – 2,83,248
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 32,26,719
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 18,58,09,302 (New Corona Cases in India)
India reports 2,67,334 new #COVID19 cases, 3,89,851 discharges & 4529 deaths (highest in a single day) in last 24 hrs, as per Health Ministry.
Total cases: 2,54,96,330
Total discharges: 2,19,86,363
Death toll: 2,83,248
Active cases: 32,26,719
Total vaccination: 18,58,09,302 pic.twitter.com/iXabFEM0M5
— ANI (@ANI) May 19, 2021
संबंधित बातम्या :
(New Corona Cases in India)