Marathi News National New army chief lt gen manoj pandey led operation parakram after the attack on parliament
New Army Chief Lt Gen Manoj Pandey : नागपुरकर मराठमोळे मनोज पांडे भारताचे नवे लष्करप्रमुख, इंजिनिअर शाखेतून पहिले
सध्या लष्कराचे उपप्रमुख मनोज पांडे हे आहेत, 29 वे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे (Manoj Naravane) यांचा 30 एप्रिल रोजी कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता नव्या लष्करप्रमुखाची नियुक्ती ताडतडीने करण्यावर सरकार भर देत आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भावी लष्करप्रमुख असण्याची शक्यता
Image Credit source: tv9
Follow us on
नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lt Gen Manoj Pandey) हे आपल्या देशाचे नवे लष्करप्रमुख (New Army Chief) असतील असे चित्र सध्या दिसू लागले आहे. सध्या लष्कराचे उपप्रमुख मनोज पांडे हे आहेत, 29 वे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे (Manoj Naravane) यांचा 30 एप्रिल रोजी कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता नव्या लष्करप्रमुखाची नियुक्ती ताडतडीने करण्यावर सरकार भर देत आहे. मात्र चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) कोण असतील यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यापासून हे पद रिक्त आहे. सीडीएसची निवड लष्करातूनच केली जाईल अशी अपेक्षा आहे कारण सीडीएस हे अर्थातच लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख असतात. भारतीय हवाई दलातील एका निवृत्त अधिकाऱ्याचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. लष्करप्रमुखांच्या नावावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही, परंतु या आठवड्यात लेफ्टनंट जनरल पांडे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. जनरल नरवणे यांच्या निवृत्तीच्या सुमारे 10 दिवस आधी नव्या लष्करप्रमुखांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
मनोज पांडे यांची लष्करातील कामगिरी
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे लष्करप्रमुख म्हणून नियुक्त होणारे पहिले इंजिनिअर असतील. मनोज पांडे हे लष्कर प्रमुख बनणारे कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्सचे पहिले अधिकारी असतील, ज्या पदावर आतापर्यंत इन्फैंट्री, आर्मर्ड और आर्टिलरी अधिकारी कार्यरत राहिले आहेत.
नॅशनल डिफेन्स अकादमीचे माजी विद्यार्थी, मनोज पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये नियुक्त करण्यात आले.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान एका इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले.
डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, ऑपरेशन पराक्रमचा भाग म्हणून, त्यांनी सैन्य आणि शस्त्रे मोठ्या प्रमाणावर भारत- पाकिस्तानच्या सीमेवर हलवली.
संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
आपल्या 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत लेफ्टनंट जनरल पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे.
ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते.