पुणे : सीरमने उत्पादित केलेली आणि अमेरिकेच्या नोव्हाव्हॅक्स कंपनीने विकसित केलेली कोव्होव्हॅक्स (Covovax vaccine) ही कोरोनावरील दुसरी लस लवकरच बाजारात येणार आहे. जून महिन्यात ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी ट्विट करत तशी माहिती दिली आहे. ब्रिटनमध्ये पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये ही लस 89.3 टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. (new Covovax vaccine will launch in june month said Adar Poonawalla)
कोरोनाला थोपवण्यासाठी देशभरात लसीकरण सुरु आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रन्टवकर्स म्हणून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्यासारख्या आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस दिल्यानंतर वृद्ध आणि आजारी असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येईल. तर दुसरीकडे देशात लसीकरण असताना सीरम सारख्या भारतीय कंपन्यांकडून अन्य लसींवर काम करणे सुरुच आहे. पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट कंपनी लवकरच कोव्होव्हॅक्स ही नवी लस बाजारात आणणार आहे. अमेरिकेच्या नोव्हाव्हॅक्स कंपनीने ही नवी लस विकसित केली आहे. या लशीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूटकडून घेतले जात आहे.
अमेरिकेच्या नोव्हाव्हॅक्स कंपनीने विकसित केलेल्या लशीच्या भारतातील चाचण्यांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने याआधीच भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर नोव्हाव्हॅक्स ही लस लवकरच बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे ही लस 89.3 टक्के परिणामकारक असल्याचे सिद्ध झाल्याचा दावा अदर पुनावाला यांनी केला आहे.
दरम्यान, क्यूटीस या कंपनीने सीरम इन्स्टिट्यूटविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. सीरमने कोव्हीशिल्ड लसीसाठी ट्रेडमार्क वापरल्याच्या आरोप क्यूटीस कंपनीने केला होता. ट्रेडमार्क वापरल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो असा दावा क्यूटीस कंपनीने केला होते. त्यासाठी क्यूटीस कंपनीने पुणे जिल्हा न्यायालयात याचिका दाकल केली होती. याच याचिकेवर निकाल देताना दोन्ही वेगवेगळी उत्पादनं आहेत, त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम होण्याचं कारण नाही, असं सांगत याचिका फेटाळली.
संबंंधित बातम्या :
(new Covovax vaccine will launch in june month said Adar Poonawalla)