नवी दिल्ली | 05 फेब्रुवारी 2024 : 22 जानेवारी 2024… या दिवशी अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याला देशभरातून लोक पोहोचले होते. बॉलिवूड सेलिब्रिटीही या कार्यक्रमाला हजर होते. त्यानंतर राम मंदिर आता सर्वांसाठी खुलं झालं आहे. राम मंदिराच्या उद्घाटनावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी एक कविता सादर केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमोल कोल्हे यांनी सादर केलेल्या कवितेची सर्वत्र चर्चा होतेय. सोशल मीडियावर या कवितेचा व्हीडिओ चर्चेचा विषय आहे.
अमोल कोल्हे यांनी संसदेत एक कविता सादर केली. रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा धागा धरत अमोक कोल्हे यांनी सद्य परिस्थितीवर भाष्य केलं आहे. तुम रहो ना रहो, ये देश रहना चाहिये…, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी कविता सादर केली. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेवरील या कवितेच्या माध्यमातून अमोस कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीवरही भाष्य केलं.
रामलल्ला के प्राण प्रतिष्ठा की बात हो,
तो किसीने कहाँ बिना कलश के प्राण प्रतिष्ठा कैसे होगी?
किसीने कहाँ चुनाव ही प्राण हो,
तो सोचो कौनसी प्रतिष्ठा दाव पर लगी है…
लोग तो कुछ कहेंगे,
लोगो का काम है कहना
आप जन की बात मत सुनना
सिर्फ मन की बात करना!
फिर भी खुश थे हम
500 साल का सपना पुरा होने जा रहा था
हमारे अंदर का हिंदू भी पुरी तरह सै जाग गया था
तो चल पडे अयोध्या की ओर रामलल्ला के दर्शन की आस लगाये
जो सामने नजारा देखा तौ दंग रह गये
पहली सिढी पर याद आयी महंगाई
दुसरी पर देश में बढती बेरोजगारी
तिसरी पर पत्रकारिता की चरण चुंबकता
चौथीवर सेंट्रल एजन्सी की संदिग्ध भूमिका
हर सिढी पर कुछ ना कुछ याद आ रहा था…
किल्ले शिवनेरीच्या छाव्याने संसदेत केलेली कविता समस्त देशवासीयांच्या काळजाला भिडली..!, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी या कवितेचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.