G20 New Delhi Summit 2023 : 9 आणि 10 सप्टेंबर या दिवशी भारताची राजधानी दिल्ली जगाचं पॉवर सेंटर बनलं होतं. अवघ्या जगाचं लक्ष राजधानी दिल्लीतील घडामोडींकडे लागलं होतं. या दोन दिवसात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. अनेक प्रस्ताव पारीत झाले. वसुधैव कुटुंबकम म्हणत भारताने या परदेशी पाहुण्यांचं स्वागत केलं अन् नवा इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज झाला. भारतने या G20 शिखर परिषदेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. तसंच येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी जगाला एक मूलमंत्र दिला.
G20 शिखर परिषद जेव्हा होते तेव्हा त्यात काही प्रस्ताव मांडले जातात. तसं या परिषेदतही काही मुद्दे मांडले गेले. 112 प्रस्तावांना या परिषदेत संमत केलं गेलं. त्यांच्यावर सर्व देशांनी सह्या केल्या. या आधी 2017 झालेल्या G20 शिखर परिषदेत 60 आउटकम निघाले होते. G20 च्या सदस्य देशांच्या मंत्र्यांनी भारतातील विविध शहरात जात पाहणी, चर्चा आणि बैठका केल्या. यावेळी यंदा 73 परिणाम दस्तावेजांवर सह्या झाल्या. यांना लाईन ऑफ एफर्ट दस्तावेज म्हणतात. 39 संलग्न दस्तावेज म्हणजे अध्यक्षीय दस्तावेजही संमत झाले.
G20 शेरपाचे अमिताभ कांत यांनी या परिषदेविषयी बोलताना G20 च्या इतिहासातील सर्वात महत्वकांक्षी G20 परिषद असल्याचं म्हटलं. यातून बारे आलेले परिणाम आणि अध्यक्षीय दस्तावेजांची संख्या पाहता मागच्या परिषदांशी तुलना करता ते दुप्पट आहे, असं ते म्हणाले.
भारताने या G20 परिषदेला अधिक सर्वसमावेशक केलं. वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्यूचर हा मूलमंत्र भारताने जगाला दिला. G20 परिषदेला नऊ सप्टेंबरला सकाळी साडे नऊ वाजता या शिखर परिषदेला सुरुवात झाली. भारत मंडपममध्ये होणाऱ्या कार्यक्रमांनी पुढचे दोन दिवस जगाचं लक्ष वेधलं.भारत मंडपममधील समिट हॉलमध्ये ‘वन अर्थ’वर पहिलं सत्र पार पडलं. त्यानंतर ‘वन फॅमिली’वर दुसरं सत्र संपन्न झालं.तर काल 10 सप्टेंबरला ‘वन फ्यूचर’वर तिसरं सत्र पार पडलं अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 चं गेवल ब्राझीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांच्याकडे सूपूर्द केलं. येत्या वर्षासाठी G-20 चं अध्यक्षपद ब्राझीलकडे असेल.