नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आता लसीकरणाच्या मुद्द्यावर ब्रिटनसह अमेरिका, चिनलाही चिंता लागून राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लस निर्मिती केंद्रांना भेट दिल्यानंतर भारतातही लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली आहे. अशावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारला आहे. (Rahul Gandhi question to PM Narendra Modi about corona vaccination)
“जगभरात 23 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. चीन, अमेरिका, ब्रिटन आणि रशियातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार?”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलंय.
23 lakh people in the world have already received Covid vaccinations.
China, US, UK, Russia have started…
India ka number kab ayegaa, Modi ji? pic.twitter.com/cSmT8laNfJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 23, 2020
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटीच्या पुढे गेल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. काही तयारी न करताच लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता.
“कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी झाली आहे आणि जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी दावा केला होता. पण अनियोजित लॉकडाऊनमुळे 21 दिवसांत लढाई जिंकली जाऊ शकत नाही. त्यामुळे देशात कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं”, असं ट्विट राहुल गांधी यांनी 19 डिसेंबरला केलं होतं.
1 Crore covid infections with almost 1.5 lakh deaths!
The unplanned lockdown did not manage to ‘win the battle in 21 days’ as the PM claimed, but it surely destroyed millions of lives in the country.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 19, 2020
भारताकडून ऑक्सफोर्ड / अॅस्ट्रॅजेनेकाच्या कोरोनाव्हायरस लसीला तातडीच्या वापरासाठी पुढील आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ब्रिटीश औषध निर्मात्याच्या लसीसाठी हिरवा कंदील देणारा भारत हा पहिला देश असू शकतो. फायझर इंक आणि स्थानिक कंपनी भारत बायोटेक यांनी तयार केलेल्या लसींसाठी ही आपत्कालीन वापराच्या अधिकृतता अर्जांवर विचार सुरू आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांना कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर
भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?
Rahul Gandhi question to PM Narendra Modi about corona vaccination