नवी दिल्ली : काल देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन झालं. त्याचवेळी संसद भवनापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंतर-मंतर मैदानावर घडलेल्या घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. जंतर मंतर मैदानावर कुस्तीपटूंचं मागच्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली अन् पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यांच्याविरोधात FIR देखील दाखल झाली आहे. त्यानंतर आज कुस्तीपटू विनेश फोगाटने एक कविता ट्विटरवर शेअर केली आहे.
काल जेव्हा पोलिसांनी या कुस्तीपटू आंदोलकांना ताब्यात घेतलं. तेव्हाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यातीलच एक फोटो विनेश फोगाटने शेअर केला आहे. त्याचसोबत “मरने का किसको ख़ौफ़ यहाँ” ही कविताही शेअर केली आहे.
दरिया अब तेरी ख़ैर नहीं,
बूँदो ने बग़ावत कर ली है
नादां ना समझ रे बुज़दिल,
लहरों ने बग़ावत कर ली है,
हम परवाने हैं मौत समाँ,
मरने का किसको ख़ौफ़ यहाँ
रे तलवार तुझे झुकना होगा,
गर्दन ने बग़ावत कर ली है॥
दरिया अब तेरी ख़ैर नहीं,
बूँदो ने बग़ावत कर ली है
नादां ना समझ रे बुज़दिल,
लहरों ने बग़ावत कर ली है,
हम परवाने हैं मौत समाँ,
मरने का किसको ख़ौफ़ यहाँ
रे तलवार तुझे झुकना होगा,
गर्दन ने बग़ावत कर ली है॥ pic.twitter.com/a5AYDkjCBu— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) May 29, 2023
संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी महापंचायतीचं आयोजन केलं होतं. यासाठी जंतर मंतर मैदानावरून संसदेच्या दिशेने हे आंदोलक जात होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या आंदोलकांच्या विरोधात आता FIR देखील दाखल करण्यात आली आहे.
कुस्तीपटू साक्षी मलिकने देखील ट्विट करत आक्रोश व्यक्त केलाय. लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्या बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात FIR दाखल करायला दिल्ली पोलिसांना 7 दिवस लागले आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आमच्या विरोधात FIR दाखल करायला 7 तासही नाही लागले. काय या देशात हुकुमशाही सुरू आहे काय? सगळं जग पाहतं आहे की सरकार आपल्या खेळाडूंना कशी वागणूक देत आहे, असं साक्षी मलिकने म्हटलं आहे.
दिल्ली पुलिस को यौन शोषण करने वाले बृज भूषण के ख़िलाफ़ FIR दर्ज करने में 7 दिन लगते हैं और शांतिपूर्ण आंदोलन करने पर हमारे ख़िलाफ़ FIR दर्ज करने में 7 घंटे भी नहीं लगाए। क्या इस देश में तानाशाही शुरू हो गई है ? सारी दुनिया देख रही है कैसे सरकार अपने खिलाड़ियों के साथ कैसा बर्ताव… https://t.co/h0TEXY0x92
— Sakshee Malikkh (@SakshiMalik) May 28, 2023