Fastag : ‘फास्टॅग’ हद्दपार, टोल टॅक्स साठी नेव्हिगेशन सिस्टीम; किलोमीटर नुसार भरा पैसे

| Updated on: Apr 30, 2022 | 11:18 PM

नव्या सिस्टीमवर प्राथमिक स्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली आहे आणि प्रायोगिक तत्वावर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांचा ग्रीन सिग्नल (GREEN SIGNAL) मिळाल्यानंतर तत्काळ नेव्हिगेशन सिस्टीम टोल वसुलीसाठी (TOLL TAX) कार्यान्वित केली जाईल. नव्या सिस्टीम नुसार वाहनाने कापलेल्या अंतराच्या आधारावर टोल टॅक्सची आकारणी केली जाईल.

Fastag : ‘फास्टॅग’ हद्दपार, टोल टॅक्स साठी नेव्हिगेशन सिस्टीम; किलोमीटर नुसार भरा पैसे
‘फास्टॅग’ हद्दपार, टोल टॅक्स साठी नेव्हिगेशन सिस्टीम; किलोमीटर नुसार भरा पैसे
Follow us on

नवी दिल्लीटोलवर टॅक्स वसुलीसाठी प्रचलित फास्टॅगची सिस्टीम (FASTTAG SYSTEM) हद्दपार होण्याची शक्यता आहे. टोलवर वाहनांच्या रांगापासून सुटका करण्यासाठी हायटेक सिस्टीम वापरली जाणार आहे. आघाडीच्या देशांत वापरण्यात येणाऱ्या नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या सिस्टीमवर प्राथमिक स्तरावर कार्यवाहीला सुरुवात झाली आहे आणि प्रायोगिक तत्वावर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांचा ग्रीन सिग्नल (GREEN SIGNAL) मिळाल्यानंतर तत्काळ नेव्हिगेशन सिस्टीम टोल वसुलीसाठी (TOLL TAX) कार्यान्वित केली जाईल. नव्या सिस्टीम नुसार वाहनाने कापलेल्या अंतराच्या आधारावर टोल टॅक्सची आकारणी केली जाईल. सध्याच्या फास्टॅग प्रणालीनुसार एक वेळ टोल टॅक्सची कपात केली जाते. महामार्गावरुन धावणाऱ्या गाडीसाठी टोल प्लाझावर विशिष्ट स्वरुपाच्या रकमेची फास्टॅग अकाउंट मधून कपात केली जाते. या प्रणालीनुसार वाहनाने कापलेल्या अंतराचा आधार घेतला जात नाही. मात्र, नेव्हिगेशन सिस्टीम वर किलोमीटरच्या आधारावर पैसे घेतले जातील.

युरोपीय राष्ट्र नेव्हिगेशनवर

नव्या प्रणालीनुसार, महामार्ग किंवा द्रूतगती मार्गावर निर्धारिक प्रवासाच्या किलोमीटर नुसार टोल टॅक्स अदा करावा लागेल. किलोमीटर आधारावर टोल टॅक्स प्रणाली युरोपीय राष्ट्रांत यशस्वी ठरली आहे. भारतात देखील नवी प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी वेगवान हालचाली घडत आहेत. जर्मनी 99 टक्के गाड्यांत नेव्हिगेशन सिस्टीम द्वारे टोल आकारणी केली जाते.

फास्टॅग कसा?

फास्टॅग ही सध्या भारतात प्रचलित असलेली एक ‘इलेक्ट्रॉनिक्स टोल गोळा करण्याची प्रणाली’ आहे. हिचे संचलन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण द्वारे करण्यात येते. याची सुरुवात एक पथदर्शी प्रकल्प म्हणून वर्ष 2014 मध्ये सुवर्ण चतुष्कोणाच्या अहमदाबाद-मुंबई महामार्गाच्या एका भागात झाली.

हे सुद्धा वाचा

नवी सिस्टीम कशी?

महामार्ग किंवा द्रूतगती मार्गावर गाडीने प्रवास सुरू केल्यास टोल मीटर ऑन होईल. प्रवास संपल्यानंतर नेव्हिगेशन सिस्टीमद्वारे पैसे कपात केले जातील. तुम्ही केलेल्या प्रवासानुसारच पैसे कपात केले जातील. भारतात सध्या 97 टक्के गाड्यांत फास्टॅग लावण्यात आले आहे आणि त्यानुसारच पैसे घेतले जातात.