Vande Bharat Train : वंदेभारतचा नवा भगवा लूक, देशाच्या तिरंग्याच्या रंगात वंदेभारत आली, प्रवाशांसाठी काय आहेत ? नव्या सुविधा

| Updated on: Jul 09, 2023 | 1:07 PM

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील कार्यक्रमात दोन नव्या वंदेभारतना हिरवा झेंडा दाखविला, त्यात गोरखपूर - लखनऊ आणि जोधपूर - साबरमती यांचा समावेश आहे.

Vande Bharat Train : वंदेभारतचा नवा भगवा लूक, देशाच्या तिरंग्याच्या रंगात वंदेभारत आली, प्रवाशांसाठी काय आहेत ? नव्या सुविधा
saffron vande bharat
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : विना इंजिनाच्या वंदेभारतचा ट्रेन सोशल मिडीयावर खूपच लोकप्रिय झाली आहे. सध्याच्या घडीला देशात विद्युतीकरण झालेल्या 25 राज्यात 50 वंदेभारत धावत आहेत. या वंदेभारतचा ( vande bharat train ) वेग हाच युएसपी असताना रेल्वे रुळांची क्षमता नसल्याने बहुतांशी भागात या वंदेभारत तिच्या क्षमतेपेक्षा कमी वेगानेच चालविण्यात येत आहेत. दोन वंदेभारत स्पेअपमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. तर आता देशाची 28 वी वंदेभारत तयार करण्यात आली असून तिला केशरी भगवा ( saffron vande bharat ) आणि करडा ( gray colour ) रंगाची रंगसंगती दिली आहे. ही वंदेभारत कशी आहे ? काय आहेत तिच्या नव्या सुविधा पाहूया…

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील कार्यक्रमात दोन नव्या वंदेभारतना हिरवा झेंडा दाखविला, त्यात गोरखपूर – लखनऊ आणि जोधपूर – साबरमती यांचा समावेश आहे. त्यामुळे देशातील कार्यरत वंदेभारतची एकूण संख्या 50 इतकी झाली आहे.

वंदेभारत एक्सप्रेस भारताची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन सेट आहे. हीला स्वंतत्रपणे इंजिन जोडण्याची गरज आहे. देशातील विद्युतीकरण पूर्ण झालेल्या सेक्शनमध्ये सध्या वंदेभारतच्या चेअर कार व्हर्जन सुरु आहेत. मुंबई ते दिल्ली किंवा राजधानी आणि शताब्दीच्या जागांवर जादा लांबच्या प्रवासासाठी धावणारी स्लिपर कोच व्हर्जन येत्या डिसेंबर महिन्यात दाखल होणार आहे.

पहिली वंदेभारत 15 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली ते वाराणसी मार्गावर चालविण्यात आली. चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीत ही ट्रेन तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू याच्या कारकीर्दीत या ट्रेनची मूळ संकल्पना मांडण्यात आली होती. या ट्रेनचे टार्गेट दिल्यानंतर आयसीएफ कारखान्यात अवघ्या अठरा महिन्यात मेक इन इंडीया मोहिमेंतर्गत ही ट्रेन तयार करण्यात आली. 2018 साली टार्गेट दिल्याने किंवा त्यामुळे तिला आधी ट्रेन – 18 असे म्हटले गेले, नंतर तिचे नामकरण वंदेभारत असे करण्यात आले. कोटा-सवाई माधवपूर सेक्शनमध्ये तिची दर ताशी 180 किमी वेगाच्या चाचणीत ही ट्रेन पास झाली.

railway minister ashwini vaishnav visit icf chennai rail coach factory

नवीन रंगाची, नव्या ढंगाची वंदेभारत…

नवीन 28 व्या वंदेभारतला देशाच्या झेंड्यातील तीन रंगाची प्रेरणा घेऊन पराक्रम तेज आणि शौर्याचा केशरी रंग देण्यात आला आहे. तसेच करड्या रंगाची डीझाईन केली आहे. या नविन आवृत्तीत प्रवाशांच्या आणि रेल्वे तज्ज्ञांच्या सूचनानूसार एकूण 25 नवे बदल केले आहेत. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या ट्रेनचा वेग पाहता एकदा दरवाजे बंद झाले की या ट्रेनला बाहेर पकडून प्रवासच करता येणार नसल्याची काळजी घेण्यात आली आहे. एका टीसीचा धावती वंदेभारत पकडताना झालेल्या अपघातानंतर हा बदल केला आहे. एण्टी क्लीबर्स किंवा एण्टी क्लिबिंग डीव्हाईस असे नवे फिचर्स देण्यात आले आहे.