भारताचं लिडिंग न्यूज नेटवर्क, नेटवर्क TV9 च्या वतीनं जर्मनीत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल शिखर सम्मेलनाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात जर्मनीचे अन्नपुरवठा आणि कृषी मंत्री सेम ओजडेमिर यांच्या भाषणानं झाली. यावेळी बोलताना त्यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. त्यांनी यावेळी बोलताना AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलीजंसचं कृषी क्षेत्रात असलेलं योगदान यावर भर दिला. त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं की भारत आणि जर्मनी हे दोन देश AI च्या मदतीनं शेतीचा विकास यासाठी एकमेकांची मदत करू शकतात.
नेमकं काय म्हणाले ओजडेमिर?
नेटवर्क TV9 च्या वतीनं जर्मनीत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल शिखर सम्मेलनामध्ये बोलताना सेम ओजडेमिर यांनी म्हटलं की, भारत हा आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेनं वेगात पाऊलं टाकत आहे.तंत्रज्ञानाच्या बाबतीत देखील भारत प्रतिस्पर्धी देशांना मागे टाकून खूप पुढे गेला आहे. भारत आणि जर्मनीमध्ये आंतरराष्ट्रीय स्थरावर चांगले संबंध आहेत. सोबतच अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करत आहेत. भविष्यात हे संबंध आणखी बळकट होऊन, दोन्ही देश अनेक क्षेत्रांमध्ये सोबत मिळून काम करू शकतील.त्यांनी आर्टिफिशियल इंटेलीजेंसबाबत बोलताना म्हटलं की, दोन्ही देश भारत आणि जर्मनी एआयचा वापर हा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी करू शकतात. ज्यामुळे कृषी क्षेत्रात एक नवी क्रांती येऊ शकते. सोबतच त्यांनी दोन देशांमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित व्यापार वाढवण्याची गरज आहे, यावर देखील यावेळी बोलताना जोर दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, भारत आणि युरोपमध्ये ट्रेड अॅग्रीमेंट होण्याची गरज आहे. जे दोन्हींसाठी खूप गरजेचं आहे.भारत आणि जर्मनी हे दोन देश रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात देखील सोबत काम करू शकतात. त्यामुळे पर्यावरणीय समस्या दूर होण्यास मदत होईल. ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्टवर भारतामध्ये सध्या खूप सारं संशोधन सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं.तसेच त्यांनी यावेळी जर्मनी इमिग्रेशन योजनेचा देखील उल्लेख केला, भारतीय कामगारांना या योजनेंतर्गत व्हिसा मिळत असल्यामुळे या योजनेतून दोन्ही देशांचा खूप फायदा होईल असं ओजडेमिर यांनी म्हटलं आहे.
कोन आहेत सेम ओजडेमिर?
ओजडेमिर हे व्यावसायानं एक शिक्षक आहेत. त्यांचा जन्म 21 डिसेंबर 1965 साली झाला. त्यांनी 1994 साली आपलं पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते पहिल्यांदा 2004 साली खासदार झाले. तीथे त्यांनी त्यांच्या राजकीय पक्षासाठी फॉरेन पॉलिसी प्रवक्ता म्हणून काम पाहिलं. त्यानंतर ते आता जर्मनीचे अन्नपुरवठा आणि कृषी मंत्री आहेत.