या पोरानं, शिक्षणाचीच माती केली; IIT ते ISIS असा उलटा प्रवास केला, आणि…

| Updated on: Oct 20, 2022 | 2:43 PM

आयआयटीचा अभ्यास करणाऱ्या पोरानं थेट दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला आणि देशविघातक कारवायामध्ये गुंतून बसला.

या पोरानं, शिक्षणाचीच माती केली; IIT ते ISIS असा उलटा प्रवास केला, आणि...
Follow us on

नवी दिल्लीः राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पकडलेल्या आणि इस्लामिक स्टेटशी (Islamic State) संबंधित असलेला दहशतवादी बासित कलाम सिद्दीकी (वया 24) (Terrorist Basit Kalam Siddiqui) याच्याबाबत आता नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. त्याला ताब्यात घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार तो पूर्वी राजस्थानमधील कोटा येथे इंजिनीअरिंगच्या परीक्षेची तयारी करत होता. त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे तो पुन्हा घरी आला. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अभ्यासही करत होता.

एनआयएने त्याला ताब्यात घेतल्यानंतर मात्र धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. आज त्याला दिल्ली न्यायालयात हजर केले जाणार असल्याने आता न्यायालय पुढे काय निर्णय देते त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

एनआयएच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले की, अफगाणिस्तानातील त्याच्या आयएसआयएस मास्टर्सच्या सुचनेनुसार तो स्फोटक ब्लॅक पावडर बनवण्याचा प्रयत्न करत होता.

त्याबरोबरच घातक असलेल्या रासायनिक पदार्थांचा वापर कसा करायचा याबाबतही तो माहिती मिळवत होता असंही तपास यंत्रणेकडून माहिती देण्यात आली आहे.

त्याच्या लॅपटॉप ताब्यात घेतला गेला असून त्यातूनही धक्कादाहक माहिती मिळाली असून त्याचा मोबाईल, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह हे साहित्य ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे.

बासित कलाम हा वाराणसीचा रहिवासी असून आयएसआयएससाठी भर्ती करणारा म्हणून तो काम करत होता अशी माहितीही समोर आली आहे.

वेगवेगळ्या वयोगटातील तरुणांचे ब्रेनवॉश करून तो इसिससाठी तरुणाना भरतीचे काम करत होता. या कामाबरोबरच व्हाईस ऑफ खोरासान या नावाचे मासिकही तो चालवत होता.

बासित कलाम हे आयएसआयएसच्या हस्तकांच्या सतत संपर्कात होते आणि त्यांच्या सांगण्यावरून व्हॉइस असंही सांगण्यात आले आहे.

बासित कलाम हा आयएसआयएसचं ऑनलाईन शिक्षण घेऊन तो त्या संघटनेचा प्रचार करणे, त्यांच ऑनलाईन साहित्य प्रकाशित करणे, ते व्हायरल करणे या कामातच तो गुंतला होता.

त्याबरोबरच बासित हा आयएसआयएसच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांना टेलिग्रामद्वारे आयईडी बनवून देण्याचे ऑनलाइन प्रशिक्षणही देण्याचं काम करत होता.

तसेच ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन भारतातील महत्त्वाच्या ठिकाणी स्फोट घडवून आणणे हाच त्याचा प्रमुख उद्देश होता असंही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.