Mahakumbh 2021 | हरिद्वारमध्ये (Haridwar) शाही स्नानासाठी साधू संतांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी कुंभात कोरोनाचा स्फोट झालेला आहे (Nirwani Head Dies Of Corona). निर्वाणी आखाड्याच्या प्रमुखांसह जवळपास 68 टॉपच्या साधू संतांना कोरोनानं गाठलं आहे. (Nirwani Head Dies Of Corona Akhada Exist Kumbh 68 Top Seers Infected)
कुंभमधून सर्वात मोठी बातमी निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर कपीलदेव दास यांचं हरिद्वारमधल्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं. 65 वर्षाच्या महामंडलेश्वरांचं निधन कोरोनानं झाल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे. कपिलदेव दास यांच्या निधनानंतर कुंभ मेळ्यातून बाहेर पडण्याची घोषणा निर्वाणी आखाड्यानं केलेली आहे. कुंभ समाप्तीचीच घोषणा त्यांनी केली आहे.
30 Sadhus have tested positive for #COVID19 so far, in Haridwar. Medical teams are going to akharas and RT-PCR tests of sadhus are being done continuously. The process will be further quickened from 17th April: Dr SK Jha, Haridwar Chief Medical Officer#Uttarakhand
— ANI (@ANI) April 16, 2021
निर्वाणी आखाडा हा 13 पॉवरफुल आखाड्यांपैकी दोन नंबरचा शक्तीशाली आखाडा मानला जातो. हा नागा साधूंचा जुन्या आखाड्यानंतरचा महत्वपुर्ण आखाडा आहे. त्यामुळे निर्वाणी आखाड्याचा निर्णय कुंभवर परिणाम करणारा आहे.
कोरोनाच्या विळख्यात साधु 5 ते 14 एप्रिल दरम्यान हरिद्धावरमध्ये कुंभ मेळ्यात जवळपास टॉपच्या 68 साधुंना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे कुंभ मेळ्यात कोरोनानं किती जणांचा मृत्यू झाला याची माहिती प्रशासनाकडे नाही. 10 ते 14 एप्रिल दरम्यान 1700 जणांना कुंभमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. यात बहुतांश साधु आहेत.
12 एप्रिलपासून जवळपास 80 हजार जणांची कुंभमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात जवळपास आठशे जण पॉजिटीव्ह सापडलेत. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकने कुंभमधून परतणाऱ्यांची कोरोना टेस्ट अनिवार्य केली आहे. महाराष्ट्रातही अशी चाचणी अनिवार्य करावी अशी मागणी नेटीझन्स करत आहेत.
Nirwani Head Dies Of Corona Akhada Exist Kumbh 68 Top Seers Infected
संबंधित बातम्या :
हरिद्वारमधील कुंभमेळ्याच्या समाप्तीची घोषणा; निरंजनी आखाड्याकडून जाहीर
कुंभमेळ्यात कोरोनाचा विस्फोट, पाच दिवसांत 1701 जण कोरोना पॉझिटिव्ह