भाजपाच्या राज्यात चक्क काँग्रेसचे मनमोहन सिंह यांचं कौतुक, नितीन गडकरींचं वक्तव्य काय?

| Updated on: Nov 10, 2022 | 8:44 AM

नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपाच्या राज्यात चक्क काँग्रेसचे मनमोहन सिंह यांचं कौतुक, नितीन गडकरींचं वक्तव्य काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्लीः केंद्रात भाजपाची (BJP) सत्ता असताना एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेसच्या मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांचं कौतुक केलंय. माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ म्हणून ओळख असलेले मनमोहन सिंह यांचं कौतुक गडकरी यांनी केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, भारतातील आर्थिक सुधारणांसाठी हा देश मनमोहन सिंह यांच्या सदैव ऋणात राहीन..

कधी राष्ट्रीय नेतृत्वावर भाष्य तर कधी विशिष्ट शैलीत देशातील राजकारणावर टिप्पणी करणारी वक्तव्य नितीन गडकरी नेहमीच करतात. मंगळवारी TIOL अवॉर्ड्स 2022 च्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. TaxIndiaOnline पोर्टलने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

नितीन गडकरी भाषणात म्हणाले, भारतातील गरीबांना ही सुविधा प्रदान करण्यासाठी देशात एक उदार आर्थिक धोरण राबवण्याची गरज आहे. १९९१ मध्ये अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी आर्थिक सुधारणांना सुरुवात केली.

त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. त्यामुळेच देशात उदार अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली.

यावेळी त्यांनी 90 च्या दशकातील काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, मनमोहन सिंह यांनी सुरु केलेल्या आर्थिक सुधारणांचा फायदा पुढे झाला. 1990 च्या दशकाच्या मध्यात महाराष्ट्रात मंत्री असताना त्यांना रस्ते बांधण्यासाठी यामुळेच निधी गोळा करता आला.

गडकरी म्हणाले, उदार अर्थव्यवस्थेचा खरा फायदा शेतकरी आणि गरीबांना होतो. यावेळी त्यांनी चीनचा दाखला दिला.

नितीन गडकरी म्हणाले, उदार आर्थिक धोरणामुळे देशाच्या विकासावर कसा परिणाम होतो, याचे चीन हे उत्तम उदाहरण आहे. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी भारतात जास्तीत जास्त भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता आहे. NHAI तर सामान्य माणसांकडूनही राष्ट्रीय महामार्गांसाठी निधी जमवत आ हे…

नितीन गडकरी पुढे म्हणाले, त्यांच्या मंत्रालयामार्फत 26 ग्रीन एक्सप्रेस वे बांधले जात आहेत. यासाठी निधीची कमतरता नाहीये. 2024 च्या अखेरीस NHAI च्या टोलमधून येणारा महसूल 1.40 लाख कोटी रुपयांनी वाढेल. सध्या हा आकडा वार्षिक 40,000 कोटी रुपये एवढा आहे.