नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी झाले. यावेळी बोलताना फारुक अब्दुल्ला म्हणाले की, प्रभू राम सर्वांचे आहेत. भगवान आणि अल्लाह एक आहेत. त्यांच्यात भेदभाव केला तर हा देश तुटून जाईल. त्यात बरोबर शेतकरी आंदोलनावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तुम्ही आज आम्हाला पाकिस्तानी, खलिस्तानी म्हणता. पण मी इथेच राहणार आणि इथेच मरणार. मी कुणालाही घाबरत नाही, अशा शब्दात अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका केली.(No difference can be made between Lord Ram and Allah, said Farooq Abdullah)
लोकसभेत बोलताना अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा सुरु केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरु झाली आहे. ती अशीच सुरु राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ऑगस्ट 2019 मध्ये कलम-370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या सर्वच भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पुढे सरकारने तिथे 2G इंटरनेट सेवा सुरु केली होती. तसंच जम्मूमधील उधमपूर, तर काश्मीरमधील गंदेरबल या जिल्ह्यांमध्ये वर्षभरानंतर 4G इंटरनेट सेवा सुरु केली होती. पण अन्य जिल्ह्यांमध्ये मात्र आतापर्यंत ही सेवा सुरु करण्यात आली नव्हती.
4G इंटरनेट सेवा सुरु केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट केलंय. “4G मुबारक! ऑगस्ट 2019 नंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये सर्वांकडे 4G मोबाईल डेटा असेल. देर आये, दुरुस्त आये!” , असं अब्दुल्ला म्हणाले.
4G Mubarak! For the first time since Aug 2019 all of J&K will have 4G mobile data. Better late than never.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) February 5, 2021
काश्मीर घाटीमध्ये गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली 4G इंटरनेट सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. सर्वोच्च न्यायालयातही गेल्या वर्षी एक याचिका दाखल करण्यात आली होती. गेल्या महिन्यात फारुक अब्दुल्ला यांनी नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं होतं.
फारुक अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये 4G इंटरनेट सेवा देण्याची मागणी केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये रक्त गोठवणारी थंडी आहे. अशावेळी लोकांकडे 4G इंटरनेट सेवा नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं. पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना अब्दुल्ला यांनी कोरोना लस सफल ठरो, यासाठी प्रार्थना केली. त्याचबरोबर समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर चालताना लोकांमध्ये धार्मिक सद्भाव आणि माणुसकीचं नातं टिकवण्याचं आवाहन केलं होतं.
संबंधित बातम्या :
‘कोरोनामुळे पत्नीचं चुंबनही घेऊ शकलो नाही’, फारुक अब्दुलांच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा
दिल्लीच्या संवेदनशील भागात सुरक्षा वाढवा, इंटरनेट सेवा बंद करा, अमित शाहांच्या अधिकाऱ्यांना सूचना
No difference can be made between Lord Ram and Allah, said Farooq Abdullah