नवी दिल्ली : देशभरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्री मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. कोरोना नियंत्रणासाठी आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही, असं मत मोदींनी व्यक्त केलंय (No need of complete lockdown to stop corona infection say PM Modi).
पंतप्रधान मोदींनी देशातील मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीत वाढत्या कोरोना रुग्णांची स्थिती आणि लसीकरणावर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही. आता पुन्हा एकदा आव्हानात्मक स्थिती तयार झालीय. काही राज्यांमध्ये हे आव्हान वाढलंय. आपल्याला गव्हर्नंसवर भर द्यावा लागेल.देशाने पहिल्या लाटेच्या टोकाला पार केलंय. यावेळचा कोरोना संसर्ग पहिल्या लाटेपेक्षा अधिक आहे. आपल्या सर्वांसाठी हा चिंतेचा विषय आहे.”
11th to 14th April can be observed as ‘Tika (vaccination) Utsav’ for COVID19 vaccination: Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/8PfY6EZftS
— ANI (@ANI) April 8, 2021
“यावेळी लोक पहिल्यापेक्षा अधिक सामान्य झालेत. त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा युद्धपातळीवर काम करावं लागेल. लोकांच्या सहभागातून आपले डॉक्टर परिस्थिती सांभाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगभरात नाईट कर्फ्युला मान्यता देण्यात आलीय. त्यालाच आपल्याला कोरोना कर्फ्यू नाव द्यावं लागणार आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.
मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर द्यावा लागणार
मोदी म्हणाले, “कोरोना नियंत्रणासाठी मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर द्यावा लागणार आहे. यावेळी कोरोनाचा सामना करण्यासाठी आपल्याकडे सर्व उपकरणं उपलब्ध आहेत. आता तर कोरोनाची लसही आहे. मात्र, पहिल्यापेक्षा यावेळी लोक अधिक निष्काळजी झाले आहेत. ”
11 ते 14 एप्रिल दरम्यान लसीकरण उत्सव
पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना 45 वर्षांवरील नागरिकांना 100 टक्के लसीकरण देण्याचा आग्रह केलाय. त्यासाठी 11 ते 14 एप्रिल दरम्यान लसीकरण उत्सव साजरा करण्याची कल्पनाही त्यांनी मांडली.
हेही वाचा :
‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचा अपमान, माफी मागा’, नाना पटोले आक्रमक
व्हिडीओ पाहा :
No need of complete lockdown to stop corona infection say PM Modi