आज नोएडामधील ट्विन टॉवर (Supertech Tower Demolition Live) पाडण्यात येणार आहे. हे टॉवर बेकायदेशीर असल्याने तब्बल 100 मीटर उचींची इमारत आज जमीनदोस्त होणार आहे. वॉटर फॉल इम्प्लोशन तंत्राचा वापर करून 32 मजली एपेक्स टॉवर आणि 29 मजली सियान टॉवर आज जमीनदोस्त (Twin Towers Demolition Live Updates) होणार आहे. हे टॉवर पाडण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, वॉटर फॉल इम्प्लोशन तंत्राचा वापर करून या इमारती अवघ्या 12 सेकंदांपेक्षा कमी वेळेत पाडल्या जातील. या तंत्रामुळे परिसरात असलेल्या इतर कुठल्याही इमारतीचे नुकसान होणार नाही. आज दुपारी अडीचच्या सुमारास हे दोन्ही टॉवर पाडले जाणार आहेत (Noida Tower Demolition Live) . दरम्यान ट्विन टॉवर पाडताना कोणीही खिडकीत, घराच्या छतावर अथवा गॅलरीत येऊन चित्रिकरण करू नये अशा खबरदारीच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
बोरिवली सोडावाला लेनच्या राजाचे जल्लोषात आगमन,
मुंबईचा बोरिवली सोडावाळा लेनचा राजा गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विघ्नहर्ताचे भव्य स्वागत करण्यात आले.
बाप्पाच्या आगमनापूर्वी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी गणपती बाप्पाचे नारळ फोडून स्वागत केले.
गोपाळ शेट्टी म्हणाले की, दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा गणपती उत्सव उत्साहात आणि चैतन्याने साजरा होणार आहे, मी कार्यकर्त्यांना विनंती करू इच्छितो की, मोदी स्वच्छ भारत अभियानाबाबत बोलत असताना अशाप्रकारे कचरा टाकणे चांगले नाही,
मी गणपती बाप्पाला विनंती करेन की आमच्या कार्यकर्त्यांना सुबुद्धी द्यावी.
वरील संपूर्ण व्यवस्था विस्कळीत आहे, त्यामुळे खाली देखील बिघडलेली आहे, गणपती बाप्पा ही सर्व व्यवस्था दुरुस्त करण्याची बुद्धी देतील असा मला विश्वास आहे.
सोडावाला लेनचा राजा 31 वर्षांचा झाला आहे, यावर्षी 25 फुटांच्या मूर्तीचे मोठ्या जल्लोषात, ढोलताशांच्या गजरात आगमन झाले आहे.
– सोलापूरमधील चिकर्डे गावच्या दिव्यांग मुलीचे मृत्यू प्रकरण
– अतिरिक्त जिल्हाधिकारी चिकर्डे गावात दाखल
– दिव्यांग निधीसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा दावा
– ग्रामस्थांच्या तीन मागण्या आहेत त्यामध्ये मृत मुलीचा छोटा भाऊ आहे त्याचे पालकत्व घ्या, संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा आणि मृत मुलीच्या कुटुंबीयांना आपत्कालीन मदतनिधी मिळावी अशा मागण्या आहेत
– यातील दोन मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत मात्र गुन्हा दाखल करण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पुढील कारवाई करुयात
– मुलीचा मृत्यू उपोषणादरम्यान झाला की नाही याबाबत तपास करुन पुढील कारवाई होईल
नोएडामधील ट्विन टॉवर जमीनदोस्त होण्यासाठी आता अवघे काही मिनिटेच बाकी आहेत. कोणत्याही क्षणीट्विन टॉवर कोसळू शकते. या दरम्यान कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून नोएडा एक्स्प्रेस वे वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच या परिसराला नो फ्लाय झोन घोषीत करण्यात आले आहे.
धोक्याचा पहिला सायरन वाजला
ट्विन टॉवर जमीनदोस्त होण्यास अवघे काही मिनिटे बाकी
घटनास्थळी चोख बंदोबस्त
दीड किलोमिटरपर्यंत सर्व रस्ते बंद
अग्निशमन दल पोलीस घटनास्थळी दाखल
आज नोएडामधील 102 मीटर उंच ट्विन टॉवर जमीनदोस्त होणार आहे. 2004 साली या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती.सर्व नियम मोडीत काढून या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. असा आरोप सुरूवातीपासूनच करण्यात येत होता.
घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 800 पेक्षा अधिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारत पाडताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी इमारतीकडे जाणारे सर्व रस्ते दीड किलोमीटर अंतरावर बंद करण्यात आले आहेत.
आज नोएडामधील ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. हे टॉवर पाडण्यात यावे या मागणीसाठी याचिकाकर्ते तेवतिया यांनी तब्बल दहा वर्ष लढा दिला अखेर त्यांचा विजय झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं आहे की, हा आमचा विजय आहे. ही इमरात पाडण्याचे दीर्घकालीन फायदे आता अवघ्या तीन महिन्यांत दिसू लागलीत.
आज नोएडामधील ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. हे टॉवर पाडल्यानंतर मोठ्याप्रमाणात धुराळा उडून प्रदूषण होणार आहे. प्रदूषण वाढू नये यासाठी धुराळ्यावर पाण्याचा मारा करण्यासाठी दहा अग्निशमन दालाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या परिसरात कोणीही जाऊ नये अशा सूचना देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.,
आज नोएडामधील बहूचर्चित ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या इमरातीच्या परिसरात जेवढ्या सोसायटी आहेत, तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या नागिरांच्या वास्तव्याची तात्पुरती व्यवस्था सिल्हवर सोसायटीमध्ये करण्यात आली आहे.
ट्विन टॉवर पाडण्यासाठी आता अवघे दोन तास शिल्लक राहिले आहेत. यादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्या ती काळजी घेण्यात येत असून, दुपारी एकनंतर ट्विन टॉवरकडे येणारे सर्व मार्ग दीड किलोमीटर अंतरावरच बंद केले जाणार आहेत. त्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास धोक्याचा सायरन वाजवण्यात येणार आहे. आणि अडीच वाजता स्फोट घटवून आणला जाणार आहे.
आज नोएडामधील ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. खबरदारी म्हणून या परिसरातील सर्व इमारतींमधून नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. मात्र दोन इमारतीमधील कुटुंबांनी बाहेर पडण्यास नकार दिला आहे. एनडीआरएफ टीमकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
नोएडामधील सुपरटेक ट्विन टॉवर्स आज पाडण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. आज दुपारी अडीच वाजता हे टॉवर्स पाडण्या येणार आहेत. टॉवर पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्फोटकाचा वारप केला जाणार आहे. खबरदारी म्हणून काही काळ नोएडा एक्स्प्रेस वेही बंद ठेवण्यात येणार आहे.
आज ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे. यादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. एनडीआरएफ टीमसोबतच 560 पोलीस आणि राखीव दलाचे 100 कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यता आले आहेत.