कोटा : राजस्थानमधील कोटामध्ये (Kota School Book Controversy) एका पुस्तकावरून आता पुन्हा वाद पेटला आहे. या पुस्तकावर बजरंग दलाकडून (Bajrang Dal) आक्षेप घेण्यात आला आहे. बजरंग दलाने विभागीय आयुक्त आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून इयत्ता दुसरीत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकावर (School Book) आक्षेप घेतला आहे. गैरमुस्लिम मुलांना अम्मी आणि अब्बू बोलायला शिकवले जात असल्याचा आरोप आहे. हे पुस्तक इंग्लिश मीडियम स्कूलचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये आईला अम्मी आणि वडिलांना अब्बू असे लिहिले आहे. एका धड्यात हा प्रश्नही विचारण्यात आला होता की आई-वडील आणि आजी-आजोबा यांना घरच्या भाषेत काय म्हणतात? बजरंग दलाचे म्हणणे आहे की कुटुंबातील सदस्यांनी यावर नाराजी व्यक्त करत त्यांना शाळेत शिकवल्या जाणाऱ्या या पुस्तकाची माहिती दिली आहे. मात्र अद्याप एकाही पालकाने गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे बजरंग दलाच्या आक्षेपावरून शिक्षण विभागाने तक्रार नोंदवली आहे.
या वादग्रस्त पुस्तकाची 113 पाने आहेत. पहिल्या अध्यायात ‘टू बिग टू स्मॉल’मध्येच मुलाला नवीन शब्द म्हणून आईला आई आणि वडिलांना अब्बू म्हणायला सांगितले आहे. याच पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणातील ‘आजोपा फारूक यांची बाग’ या नावाने मुस्लिम पात्र अमीर आणि त्याचे आजोबा फारूख यांचे उदाहरण देण्यात आले आहे.
याच पुस्तकाच्या सहाव्या प्रकरणात पान क्रमांक 20 वर पालक स्वयंपाकघरात आहेत आणि ते बिर्याणी बनवत आहेत असे सांगितले आहे.यामुळे मुलांना मांसाहारी इस्लामिक पदार्थ खायला प्रवृत्त होत आहे, असाही आरोप आता बजरंग दलाकडून करण्यात आला आहे. तेसच कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे की आमची मुले आता अब्बू, अम्मी म्हणू लागली आहेत आणि ते घरी बिर्याणी बनवायला सांगत आहेत, असेही बजरंग दलाकडून सांगण्यात आले आहे. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षणाच्या इस्लामीकरणासाठी अशी पुस्तके दिली जात असून त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचे बजरंग दलाने सांगितले.
भारताला हिंदू मुस्लिम हा वाद नवा नसला तरी. गेल्या काही दिवसात हा वाद शाळांपर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता या पुस्तकावरून आरोप झाल्याने या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी ही बजरंग दलाकडून करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाची मात्र याबाबत अद्याप कोणतीही बाजू किंवा स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. त्यामुळे ते यात काय भूमिका घेतात हेही पाहणं तितकेच महत्वाचं ठरणार आहे.