नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभांबाबत केंद्र सरकारने (Guidelines for weddings) महत्वाचा निर्णय घेतला आहे. केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जर 50 पेक्षा जास्त लोक लग्न समारंभात आढळले, तर लग्नासाठी परवानगी मागणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. जरी 50 लोकांना लग्नात उपस्थित राहण्याची परवानगी दिली असली, तरी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करण्यासही केंद्राने बजावलं आहे. (Guidelines for weddings)
देशात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन करण्यात आला आहे. पहिल्यांदा 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 14 एप्रिलपर्यंत मग त्यानंतर 3 मेपर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आला. मात्र तरीही कोरोना अद्याप अटोक्यात न आल्याने लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढवून तो 17 मेपर्यंत करण्यात आला आहे.
No organization is allowed to gather 5 or more people in one place; not more than 50 people can be allowed to gather in wedding-related functions; not more than 20 people permitted at funerals; social distancing too needs to be followed on all these occasions – @HMOIndia
— PIB India #StayHome #StaySafe (@PIB_India) May 5, 2020
मार्च ते मे हे महिने म्हणजे लग्नाचा हंगाम असतो. या तीन महिन्यात अनेक लग्नसमारंभ होत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे या तीनही महिन्यात अनेक लग्न रखडली. शिवाय लग्नाचे हॉल यांनाही बंदी घालण्यात आली असून, हॉलमालकांना लग्नाचे घेतलेली अॅडव्हान्स रक्कमही परत करण्याचे आदेश दिले होते. या गोष्टीचा विचार करुन लग्न समारंभासाठी केंद्र सरकारने काही नियमावली बनवली आहे.
लग्नांसाठी नियम
या नियमांसह लग्नसमारंभाना परवानगी देण्यात आली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास, संबंधितांवर कारवाई होणार आहे.
अंत्ययात्रेत 20 पेक्षा जास्त लोक नको
केंद्रीय गृहमंत्रालयाने जसे लग्न समारंभासाठी नियम ठरवले आहेत, तसेच अंत्ययात्रेसाठीही नियम ठरवून दिले आहेत. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, अंत्ययात्रेत केवळ 20 लोकच सहभागी होऊ शकतील. त्यापेक्षा जास्त लोकांनी अंत्ययात्रेत हजेरी लावू नये, असंही केंद्र सरकारने बजावलं आहे.
(Guidelines for weddings)
संबंधित बातम्या
लॉकडाऊन वाढल्याने लग्न लांबली, विदर्भातील हजारपेक्षा अधिक लग्न लांबणीवर
कोरोनाचा धसका, कोकणातील मुलींचा मुंबई आणि पुण्यातील मुलांसोबत लग्न करण्यास नकार
Lock Down | मंगल कार्यालयाचे अॅडव्हान्स परत द्या, प्रशासनाचे आदेश, लॉकडाऊनमुळे लग्न लांबली