Third Front : भाजपविरोधात आता तिसरा प्रयोग! कोणाला नुकसान कोणाला फायदा

| Updated on: Sep 17, 2023 | 5:30 PM

Third Front : लोकसभा निवडणुकीत आता तिसरा प्रयोग होऊ घातला आहे. भाजपविरोधात INDIA आघाडीने मोट बांधलेली असताना, तिसरा मोर्चा पण उभा ठाकत आहे, कोण बांधतंय मोट

Third Front : भाजपविरोधात आता तिसरा प्रयोग! कोणाला नुकसान कोणाला फायदा
Follow us on

नवी दिल्ली | 17 सप्टेंबर 2023 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यात तिसऱ्या मोर्चाचा प्रयोग रंगू शकतो. भाजपला शह देण्यासाठी INDIA Alliance ने दंड थोपाटले आहेतच. आता तिसरा मोर्चा पण भाजपविरोधात निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. पण हा तिसरा मोर्चा भाजपला फटका देतो की इंडिया आघाडीचे मत फोडतो हे येत्या काळात समोर येईलच. इंडिया आघाडीच्या रुपाने अनेक पक्षांची मोट बांधण्यात यश आले आहे. आता जागा वाटपावर इंडिया आघाडी तोडगा काढणार आहे. दरम्यान या आघाडीत जे पक्ष सहभागी झाले नाहीत. ते आता तिसऱ्या मोर्चाचा (Third Front) प्रयोग करणार आहे. यापूर्वी डाव्या पक्षांनी तिसऱ्या आघाडीची दाखल घ्यायला लावली होती.

या पक्षांचा सहभाग

हे सुद्धा वाचा

लोकसभा निवडणुकीपूर्वीच आघाड्या, मोर्चांचे राजकारण आता चांगलेच तापले आहे. भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी सर्वच जण गणित मांडत आहेत. INDIA आघाडीनंतर तिसऱ्या मोर्चा मैदानात उतरणार आहे. AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, बसपा प्रमुख मायावती, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव आणि महाराष्ट्रातील काही पक्ष यामध्ये सहभागी होतील. पण हे पक्ष INDIA आघाडीचे सदस्य नसतील याची खबरदारी घेण्यात येत आहे.

INDIA आघाडी सक्षम नाही

ओवेसी यांनी तिसऱ्या मोर्चाच्या पायाभरणीलाच भाजपऐवजी INDIA आघाडीविरोधात मोर्चा उघडला. भाजपविरोधात लढण्यासाठी INDIA आघाडी सक्षम नसल्याचा टोला त्यांनी हाणला. केसीआर यांच्या नेतृत्वाखालील तिसरा मोर्चा भाजपविरोधात सक्षम पर्याय असल्याचा दावा त्यांनी केला. INDIA आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले नाही, यावर छेडले असता, त्यांनी त्याची काळजी नसल्याचे सांगितले.

केसीआर हेच नेते

बसपा नेत्या मायावती, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि महाराष्ट्रातील, पूर्वोत्तरमधील अनेक पक्ष INDIA आघाडीत नाहीत. त्यामुळे INDIA आघाडीत असल्या-नसल्याने काही फरक पडत नाही. केसीआर यांच्या नेतृत्वात तिसरा मोर्चाने कमान सांभाळावी असे त्यांनी सूचवले. ते अनेक दिवसांपासून या मोर्चाची चर्चा करत आहेत.

थर्ड फ्रंट तयार करण्याचा प्रस्ताव

INDIA आघाडीने अनेक धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेतले नाही. या आघाडीने अनेकांना बोलावले नाही. आघाडी त्यांना अस्पृश्य मानते असा दावा करत ओवेसी यांनी तिसऱ्या मोर्चाचा पर्याय सुचवला आहे. त्यातच नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि महेबुबा मुक्ती हे तर भाजपसोबत सत्तेत असल्याचा चिमटा ही त्यांनी काढला. भाजपविरोधी मोर्चात त्यांनी आम्हाला दुर्लक्षित केले. आम्ही पण भाजपला हरविण्यासाठी तयार असल्याचा दावा ओवेसी यांनी केला.


आता जागा वाटपावर खल

भाजपविरोधात INDIA आघाडीने शड्डू ठोकले आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या आघाडीच्या प्रयोगाची चर्चा केली होती. पण आज तेच आघाडीत कोपऱ्यात बसले आहेत. आतापर्यंत पाटणा, बंगळुरु आणि मुंबईत INDIA आघाडीच्या तीन बैठकी झाल्या आहेत. अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही. सर्व घटक पक्ष लवकरच आपसातील वाद सोडवतील अशी आशा त्यांना आहे.