Lok Sabha Election 2024 च्या प्रचाराचे रणशिंग फुंकले गेले आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात प्रचाराला धार आली आहे. प्रचारा कार्यातील खर्चासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) वस्तूंच्या किंमतींची यादी आणि उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा जाहीर केली आहे. यामध्ये चहा, कचोरी, समोशासह जवळपास 200 वस्तूंचा सहभाग आहे. त्यातंर्गत राजकीय पक्षांना खर्च करताना लक्ष ठेवावे लागेल. त्यानुसार चहा,समोसा 10 रुपये तर कॉफी आणि शीतपेयासाठी 15 रुपये खर्चास मंजूरी देण्यात आली आहे. तर 100 रुपयांत शाकाहारी थाळी, 180 रुपयांत मांसाहारी थाळीचा खर्च करता येईल. इतर अनेक खर्चाची यादीच निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक प्रचारात खर्च होणारा ही रक्कम निवडणूक खर्चात जोडण्यात येईल.
खर्चाची मर्यादा इतके लाख
निवडणूक अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक
उमेदवाराला कोणताही कार्यक्रम घेण्यापूर्वी स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. निवडणूक विभाग विविध कार्यक्रम, जाहीर सभा यांची रेकॉर्डिंग आणि खर्चाचे विश्लेषण करणार आहे. त्यासाठी एक टीम पाठवते. ही टीम उमेदवार खर्चाची मर्यादा पालन करत आहेत की नाही यावर लक्ष ठेवते.
वाहनांवरील खर्चाची मर्यादा निश्चित
प्रचारात वाहन वापरासाठीचे दर निश्चित करण्यात आले आहे. दुचाकीचे भाडे रोजी 300 रुपयांचा खर्च, तर ई-रिक्शासाठी 600 रुपयांचे किराया हा दर आहे. होंडा सिटी आणि टाटा सफारी सारख्या एसयुव्हीचे भाडे 3,000 रुपये प्रति दिवस निश्चित करण्यात आले आहे. टोयोटा इनोव्हा, फॉर्च्युनर सारख्या वाहनांसाठीचे भाडे 3,000 रुपये असेल. तर पेजेरो वाहनासाठी प्रति दिवस 3,200 रुपयांच्या खर्चाची मर्यादा निश्चित आहे.