नवी दिल्ली : नवी दिल्लीतील हॉलिडे इन हॉटेल येथे काल संध्याकाळी न्यूज टेलिव्हिजन अवॉर्ड्स 2022 (News Television Awards 2022) या पुरस्काराने TV9 नेटवर्कला (TV9 Network) सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आले. या वर्षी 40 श्रेणींमध्ये दिलेल्या एकूण 154 पुरस्कारांपैकी, TV9 नेटवर्कला 46 पुरस्कार जिंकले आहेत, या पुरस्काराने टीव्ही नाईनच्या यशामध्ये आणखी एक शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 46 पुरस्काराने (46 Awards) गौरव झाल्याबद्दल टीव्ही नाईन पुन्हा एकदा निर्विवाद क्रमांक 1 न्यूज नेटवर्क म्हणून सिद्ध झाले आहे.
गेल्या वर्षभरात भारतीय टेलिव्हिजन वृत्तवाहिन्यांच्या क्षेत्रात केलेल्या महत्वपूर्ण केलेल्या कार्याबद्दल IndianTelevision.com कडून वेगवेगळ्या पुरस्कारांनी वृत्तवाहिन्यांना गौरवण्यात आले. हा कार्यक्रम नवी दिल्लीत हॉलिडे इन येथे पार पडला. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक हे Dalet होते.
कार्यक्रमामध्ये प्रादेशिक वृत्तवाहिन्यांमधील विविध पदावर काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
एनटी पुरस्कार 2022 मध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, बांगला, गुजराती आणि कन्नड या भाषांसह इतर भाषांमध्ये कार्य करणाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. वृत्तवाहिन्यांमधील प्रत्येक भाषेच्या पाच श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली होती. ज्यामध्ये ‘प्रोग्रामिंग अवॉर्ड्स’, ‘पर्सनॅलिटी अवॉर्ड्स’, ‘प्रोमो, डिझाईन आणि पॅकेजिंग अवॉर्ड्स’, ‘सेल्स अँड मार्केटिंग अवॉर्ड्स’ आणि ‘स्पेशल अवॉर्ड्स’. या प्रकारच्या बक्षीसांनी गौरव करण्यात आला.
या वर्षी 40 श्रेणींमध्ये एकूण 154 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये पुरस्कारप्राप्त वृत्तवाहिन्या आणि उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींना हे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये टीव्ही 9 नेटवर्क, झी मीडिया कॉर्पोरेशन, नेटवर्क18 ग्रुप, इंडिया टुडे ग्रुप, टाइम्स नेटवर्क, एनडीटीव्ही, एबीपी नेटवर्क यांसारख्या वृत्तवाहिन्यांचा समावेश होता. या वृत्तसमुहामधील चॅनल प्रोग्रामर, अँकर, प्रस्तुतकर्ता, तंत्रज्ञ, निर्माता, संपादक, रिपोर्टर आणि व्यवस्थापन या सर्वांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.TV9 भारतवर्षच्या गल्फ ऑइलसह सुरक्षा बंधन यांना अनुक्रमे ‘न्यूज नेटवर्कद्वारे सामाजिक योगदान’ याबद्दल टीव्ही 9 ला गौरवण्यात आले.
पुरस्कारासाठी सन्मानित ज्युरीमध्ये एच+के स्ट्रॅटेजीज इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुल्याणी, श्री अधिकारी ब्रदर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अधिकारी मार्कंड, ओएमडी इंडियाच्या सीईओ अनिशा अय्यर, एअरटेल व्हीपी-मीडिया अर्चना अग्रवाल, अपस्टॉक्सचे वरिष्ठ संचालक-मार्केटिंग कुणाल भारद्वाज, यांचा समावेश होता.