नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद (Prophet Mohammad) यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर शुक्रवारी ‘जुमा की नमाज’नंतर देशाच्या अनेक भागात प्रचंड हिंसाचार झाला. पोलिसांवर दगडफेक (stone pelting on police) करण्यात आली. यात सर्वसामान्यांव्यतिरिक्त अनेक पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान देखील जखमी झाले. त्यानंतर आता केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस प्रमुखांना सज्ज राहण्यास आणि सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच काही काही लोक त्या वादग्रस्त वक्तव्यावरून धार्मिक दंगली पेटवण्याचे काम करतील. तसेच ते यातून पोलिसांना लक्ष केले जाऊ शकते, असे मंत्रालयाने म्हटले आहे. तर केंद्रीय गृहमंत्रालयाने (Union Home Ministry) हिंसाचारग्रस्त राज्यांकडून अहवाल मागवला आहे.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेट दरम्यान प्रेषित मंहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. तर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशाच्या विविध भागात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना एक निवेदन जारी केले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही तैनात केलेल्या पोलिसांना योग्य दंगल नियंत्रण करण्यासाठी टॉप गिअरमध्ये राहण्यास सांगितलं असल्याचे त्या निवेदन म्हटलं आहे. देशातील शांतता जाणूनबुजून बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. पोलिस आणि आवश्यक असल्यास निमलष्करी दल देखील सहभागी होईल.” अलर्ट मोडवर असणे आवश्यक आहे जेणेकरून ते कोणत्याही अप्रिय परिस्थितीला तोंड देऊ शकतील.
तसेच भडकाऊ भाषणे देणाऱ्या घटकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना ही केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मिळाल्या आहेत. तसेच राज्य पोलिसांना हिंसाचाराचे लाईव्ह व्हिडिओ आणि प्रक्षोभक भाषणे पोस्ट करणाऱ्यांची ओळख पटवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच अशा लोकांवर आवश्यक कारवाई करा असेही त्या निवेदनात म्हटलं आहे.
तसेच गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्यास, सीमांवर लक्ष ठेवण्यास आणि असुरक्षित क्षेत्रे ओळखण्यास सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये भडकलेली हिंसा आणि मुरादाबाद, सहारनपूर आणि फिरोजाबादमध्ये निदर्शने झाल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला आहे.दरम्यान, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, पंजाब, हैदराबाद आणि गुजरातसह इतर अनेक राज्यांमध्येही नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात प्रचंड निदर्शने झाली.
यादरम्यान महाराष्ट्रातील सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना परभणीमध्येही नमाजनंतर शेकडो मुस्लिम रस्त्यावर उतरले. तसेच नुपूर शर्मांनी केलेल्या वक्तव्यावर जोरदार घोषणाबाजी केली. तर या आंदोलनांच्या बाबतीत आधीच राज्य पोलिसांना माहिती दिली होती. तसेच कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासह सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी सर्वोच्च श्रद्धास्थानाबद्दल जर कुणी अशाप्रकारे चुकीचे उद्गार काढत असेल तर तो राग येणे स्वभाविक असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच नुपुर शर्मा, नवीन कुमार जिंदाल यांच्याविरोधात महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु याबाबत योग्य कारवाई ही केंद्रीय गृहखात्यानेच करायला हवी. तर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडलेला नाही. पोलिसांनी योग्य परिस्थिती हाताळली. मुस्लीम समाजानेही शांततेत आंदोलन केले. कुठेही कटुता निर्माण झालेली नाही. दुसऱ्याच्या श्रद्धास्थानाचा अनादर करण्याचं काम कुणीही करू नये. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सर्व समाजातील लोकांनी सहकार्य करावे असं आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नुपूर शर्मा व कुमार जिंदाल यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. तसेच दंगाभडकावणाऱ्यांना धरून पोलिसांकडे देण्याची जबाबदारी ही मुस्लिम समाजाची असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी हे करण्याची जबाबदारी सच्चा मुस्लिमानची असल्याचेही म्हटलं आहे. तर देशात वातावरण तणावपूर्ण बनले आहे. नुपूर शर्माने जे वक्तव्य केलंय त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. हे वक्तव्य करून 10 दिवस झाले, लोक दहा दिवस शांत होते. मात्र आतापर्यंत कारवाई झालेली नाही. फक्त निलंबन केले म्हणजे कारवाई होत नाही. गुन्हा दाखल झाला पाहिजे. अटक झाली पाहिजे. मुहंमद पैगंबर यांच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी एक कायदा झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.