ओडिसा : एखाद्या पेशंटला तात्काळ रुग्णालयात पोहोचवण्याचं काम अॅम्बुलन्स (Ambulance) ड्राइव्हरचं (Driver)असतं. परंतु एका ड्राईव्हरने दारुच्या दुकानासमोर अॅम्बुलन्स थांबवून दारु खरेदी केली. त्यानंतर स्वत:दारु पिला आणि रुग्णाला सुद्धा त्याने दारु पाजली असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. संबंधित व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, अॅम्बुलन्सच्या चालकाचा शोध पोलिस घेत आहेत.
हा संबंधित व्हिडीओ ओडिसा राज्यातील कटक जिल्ह्यातील असल्याची चर्चा आहे. चालकाने दारु पिऊन झाल्यानंतर सोबत असलेल्या अॅम्बुलन्समधील आजारी पेशंटला सुध्दा पेग दिला आहे. तो पेग तो स्ट्रेचरवर झोपून पित असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ज्यावेळी एका नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी त्याने आपल्या मोबाईलमध्ये शुट करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. शुटींग करणाऱ्या व्यक्तीने ज्यावेळी चालकाला प्रश्न विचारला की, तु का दारु पाजत आहेस. त्यावेळी पेशंटला स्वत:ला दारु प्यायची आहे असं उत्तर दिलं. त्यावेळी अॅम्बुलन्समध्ये लहान मुलगा आणि एक महिला सुद्धा असल्याची माहिती शुटिंग करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे.
डॉक्टरांना याबाबत विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, ती अॅम्बुलन्स एका दारुच्या दुकानाच्यासमोर होते. त्यामुळे आरटीओचे अधिकारी काय ते कारवाई करतील.