कोलकाता : ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांसमोर आता मोठी अडचण निर्माण झाली आहे. अपघातात मृत पावलेल्या नातेवाईकांना मृतदेह मिळत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे आता मृतदेहांची ओळख पटत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. तर त्याच वेळी, भुवनेश्वरमधील अनेक पीडित कुटुंबीयांनी दावा केला आहे की त्यांना कोणाचेही मृतदेह देण्यात आले आहेत. त्यामुळे अपघात झाल्यापासून काही नातेवाईक त्यांच्या संबंधातील व्यक्तींचा मृतदेह शोधत आहेत. तर दुसरीकडे डीएनए चाचणीचा निकाल आल्यानंतरच मृतदेह ताब्यात देण्यात येतील असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भुवनेश्वर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सांगितले की, काही नातेवाईकांना आता त्यांच्या लोकांचे मृतदेह मिळत नसल्यामुळे विलंब होत आहे.या कारणामुळेच डीएनए चाचणी आवश्यकता असल्याचेही सांगण्यात आले आहे. यामुळेच ही प्रक्रिया पारदर्शक आणि त्रुटीमुक्त असावी असंही सांगण्यात आले आहे.
त्यामुळे आपल्या नातेवाईकांचा मृतदेह दुसऱ्या कोणाला तरी दिल्याचे सांगणाऱ्या कुटुंबीयांचा दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. सध्या डीएनए चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांना यावेळी सांगितले.
भुवनेश्वरमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये एका 30 वर्षीय महिलेने सांगितले की तिच्या 16 वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे.
त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे मात्र आबाबत कोणतीही माहिती त्यांनी कुटुंबीयांना दिली नाही. तर काहीच्या बाबतीत नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात न देता दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह ताब्यात देण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमधील रहिवासी असेलेल्या झकेरिया लस्कर म्हणतात की तिला रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की मालदा येथील एका महिलेने तिचा काका अबू बकर लस्कर यांच्या मृतदेहावर दावा केला आहे.
मालदा येथील महिलेने मृतदेह घेऊन गेल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तर आपला मुलगा गमावलेल्या शेख अब्दुल गनी यांनाही अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलाचा अजून मृतदेह ताब्यात देण्यात आला नाही.त्यामुळे अपघात झाल्यापासून त्यांच्या मुलाच्या मृतदेहाचा शवगृहात शोध घेत आहेत.