ऐतिहासिक जगन्नाथ रथ यात्रेत चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती, अनेक लोक जखमी

| Updated on: Jul 07, 2024 | 9:14 PM

जगन्नाथ रथ यात्रेत दरवर्षी लाखो भाविक भव्य रथांचे दर्शन घेण्यासाठी आणि या रथांना ओढण्याचे भाग्य मिळण्यासाठी प्रचंड गर्दी करतात. त्यामुळे अनेकदा भव्य रथाचे चाक अंगावर येऊन भाविक जखमी झाल्याच्या घटना घडत असतात.

ऐतिहासिक जगन्नाथ रथ यात्रेत चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती, अनेक लोक जखमी
odisha jagannath yatra stampedes like situation
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

ओडिशा : ओडीशा येथील जगन्नाथ रथ यात्रा आज निघाली आहे. ओडिशा जगन्नाथ यात्रेत रथ ओडताना चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने अनेक भाविक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने हॉस्पिटलात नेण्यात आले आहे. पुरी येथील बडा डांडा परिसरात हा प्रकार घडला आहे. हा अपघात झाल्यानंतर लागलीच गर्दीवर नियंत्रण मिळवून दक्षता घेतली जात आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे कथित भोले बाबाच्या दर्शनासाठी भरलेल्या सत्संगात अनेक महिला आणि मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आता अशा गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने लक्ष ठेवण्याचा अधिक काळजी  घेण्याचा आदेश दिला आहे.

ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी येथे रविवारी भव्य जगन्नाथ रथयात्रा शोभायात्रा निघाली. या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, या दरम्यान अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमीला रुग्णालयात नेण्यात आले.पुरीच्या बडा दांडा येथे ही घटना घडली असून अपघातानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. रथ ओढत असताना देखील झालेल्या एका अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. भगवान बलभद्र यांचा रथ ओढत असताना हा अपघात घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पूजा

पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी आज त्यांच्या शिष्यांसह भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथांचे दर्शन घेतले. पुरी येथील संस्थानिकांचे वारस असलेल्या राजाच्या हस्ते ‘छेरा पहानरा’हा ( रथ साफ करणे) विधी पार पाडला. त्यानंतर सायंकाळी 5.20 वाजण्याच्या सुमारास रथ ओढण्याचा पारंपारिक धार्मिक विधी सुरू झाला. रथांला पुढे लाकडी घोड्यांची आरास आणि सजावट करण्यात आली होती आणि देवांच्या पुजाऱ्यांनी भाविकांना रथ योग्य दिशेने खेचण्यासाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही रथांना ‘प्रदक्षिणा’घातली आणि देवांची प्रार्थना केली.

ऐतिहासिक दृष्ट्या महत्व

ओरीसातील जगन्नाथ रथयात्रा जगभरात प्रसिद्ध आहे. तिला आगळेवेगळे ऐतिहासिक विशेष महत्त्व आहे.ही रथयात्रा काढून भगवान जगन्नाथांना प्रसिद्ध गुंडीचा माता मंदिरात नेले जाते. या मंदिरात देव 7 दिवस विश्रांती घेतात. यावेळी गुंडीचा माता मंदिरात विशेष सजावट आणि पूजाअर्चा केली जाते आणि मंदिराच्या स्वच्छतेसाठी इंद्रद्युम्न सरोवरातून पाणी आणले जाते. नंतर भगवान जगन्नाथाचा परतीचा प्रवास सुरू होतो.