बालासोर : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेला (Railway accident) तीन दिवस झाले असून, बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर आता रेल्वे रुळावरूनही वाहतूकही हळूहळू सुरू झाली आहे. अपघातात 280 हून अधिक लोकांचा मृत्यू (death) झाला, तर अनेक लोक अजूनही हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. या दुर्घटनेत कित्येक घरं उध्वस्त झाली, अनेकांनी आपले प्रियजन गमावले. तर काही जण अजूनही आपल्या नातेवाईकांच्या येण्याच्या वाट पाहत डोळे लावून बसले आहे. ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेगवेगळ्या कहाण्याही समोर येत आहेत. या सगळ्यामध्ये ज्या ठिकाणी ही भीषण रेल्वे दुर्घटना घडली, त्या ठिकाणी रेल्वे रुळांवर काही नोटबुकची विखुरलेली पाने सापडली आहेत, ज्यावर बंगाली भाषेत प्रेम व्यक्त करण्यात आले आहे.
त्या वही अथवा डायरीच्या पानांवर हाताने प्रेमासंबंधी कविता लिहिल्या आहेत. बंगाली भाषेत लिहिलेल्या कवितेचा अर्थ असा आहे- ‘छोटे ढग पाऊस पाडतात, छोट्या छोट्या कथांनी प्रेम होतं.’ डायरीच्या या फाटलेल्या पानांवर हत्ती, मासे आणि सूर्य यांची रेखाचित्रे काही खरडलेले आहे. ट्रेनमधील एखाद्या प्रवाशाने त्याच्या मनातील भावना या कागदांवर व्यक्त केले आहे. मात्र तो प्रवासी नेमका कोण, याची अद्याप ओळख पटलेली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बंगाली भाषेत लिहिलेल्या या हस्तलिखित कवितेचे काही भाग पुढीलप्रमाणे आहेत.
‘अल्पो अल्पो मेघा थाके,
हल्का ब्रिस्टी होय,
छोटो-छोटो गलपो थेके भालोबाशा सृष्टि होय’
त्याचा अर्थ असा आहे की – ‘ ढगांमधून पावसाचे थेंब पडतात, आपण काही कहाण्या ऐकल्या होत्या, त्याच्यातूनच प्रेमाचा कळ्या उमलल्या आहेत ‘ रेल्वे रुळांवर विखुरलेल्या अशाच एक अर्धवट कवितेची पाने सापडली, त्यातही बंगाली भाषेत काही ओळी खरडल्या आहेत, त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे-
‘ मला तुझी नेहमी गरज असते, तू माझ्या मनात नेहमीच असतोस.’ या कविता वाचून लोक भावूक झाले आणि एका व्यक्तीने लिहिले, ‘किती ह्रदयद्रावक..जीवन किती क्षणभंगूर असते, ते कळते होते ‘ स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कविता किंवा नोटबुकवर दावा करण्यासाठी आतापर्यंत कोणीही पुढे आलेले नाही. लेखकाचे काय झाले? ही माहितीही मिळू शकली नाही.
कसा झाला अपघात ?
ट्रेन क्रमांक १२४८१ कोरोमंडल एक्सप्रेस बहंगा बाजार स्टेशनच्या (शालिमार-मद्रास) मुख्य मार्गावरून जात होती, त्याचवेळी ती रुळावरून घसरली आणि अप लूप मार्गावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ट्रेन पूर्ण वेगाने धावत होती, त्यामुळे 21 डबे रुळावरून घसरले आणि 3 डबे रुळावरून खाली गेले.
प्रत्येक रेल्वे स्टेशनला दुसरी ट्रेन पास करण्यासाठी लूप लाइन असते. बहनगा बाजार स्टेशनवर अप आणि डाऊन अशा दोन लूप लाइन आहेत. स्टेशनवरून दुसरी ट्रेन पास होणार असते तेव्हा कोणतीही ट्रेन लूप लाइनवर उभी केली जाते.