नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे अपघातानंतर मोदी सरकारवर विरोधकांनी जी टीका सुरु केली आहे, त्या टीकेला मोदी सरकारने मागील रेल्वे मंत्र्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यावेळेसचे रेल्वेमंत्री फक्त फोटो काढण्यासाठी पुढे होते, मात्र अपघातानंतर आताचे रेल्वे मंत्री घटनास्थळी अजूनही ठाण मांडून आहेत. मोदी सरकारच्या काळात यापूर्वीच्या सरकारपेक्षा कमी अपघात झाल्याचा दावा, रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार केला आहे. पाहा मोदी सरकारने अपघातानंतर नेमका काय दावा केला आहे पाहा.
1. यापूर्वीचे रेल्वेमंत्री फक्त फोटोपुरता मर्यादीत, आता घटनास्थळी ठाण मांडून
पूर्वी आपण पाहिले की रेल्वे मंत्र्यांच्या कृती अपघाताच्या वेळी फोटो काढण्यापुरत्याच मर्यादित होत्या. ममता बॅनर्जींसारख्या लोकांनी तेव्हा राजकारणही केले. येथे आमच्याकडे एक रेल्वे मंत्री आहेत, जे गेल्या 30 तासांपासून घटनास्थळी आहेत, आणि बचाव आणि इतर प्रयत्नांमध्ये अथकपणे सहभागी आहेत.
2. हा सरकारी दृष्टीकोन बदलला
हा अपघात भयंकर असला तरी, भूतकाळातील सायलो पध्दतीच्या विपरीत सर्व एजन्सी एकत्रितपणे कशा प्रकारे काम करत आहेत, हे एक पूर्णपणे वेगळं चित्र आहे. रेल्वे, एमएचए, एनडीआरएफचे अधिकारी समन्वयाने काम करत आहेत. आरोग्य मंत्रीही घटनास्थळी आहेत आणि नुकसान कमी करण्यासाठी चांगले वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी सर्व सुविधांची खात्री केली जात आहे.
3. विरोधकांचा प्रचार विरुद्ध सरकारची पूर्ण पारदर्शकता
विरोधक काल अपघात आणि कवचच्या कारणांचा अपप्रचार करण्यात गुंतले असताना सरकार मात्र कृतीशील आणि पारदर्शक आहे. सरकारने केवळ अपघाताची संपूर्ण माहितीच दिली नाही, तर पारदर्शकपणे मृतांचा आकडाही शेअर केला आहे.