ओला E Scooter वारंवार नवी प्रकरण उजेडात येत आहेत. सुरुवातीच्या काळात अनेक कंपन्यांनी (Company) ग्राहकांना स्कुटर (E Scooter) खरेदी करण्यासाठी चांगली आश्वासने दिली. परंतु नंतर स्कुटरची अनेक कारणे समोर आली होती. विशेष म्हणजे चालू गाडीला आग लागणे, बॅटरीचे स्फोट (Battery Blast) होणे अशा प्रकरणामुळे इलेक्ट्रिक बाईक प्रचंड चांगलीचं चर्चेत आली होती.
एका संजीव जैन या व्यक्तीने सहा दिवसांपुर्वी इलेक्ट्रीक स्कुटर खरेदी केली होती. ज्यावेळी तो त्याच्या कॉलनीत फेरफटका मारत होता. त्यावेळी चालू गाडीचे अचानक सस्पेंशन तुटलं, त्यानंतर अचानक पुढचं चाक निघून पडलं.
ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी जैन यांनी गाडीचे फोटो काढले आणि ते फेसबुकला शेअर केले. त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा झाली.
ओला एस 1 प्रो या स्कुटरची किंमत 1 लाख 39 हजार आहे. याच्या आगोदर सुद्धा स्कुटर जळाल्याच्या अशा अनेक घटना उजेडात आल्या आहेत.
ओला ई स्कुटरची विक्री सप्टेंबर महिन्यात सगळ्यात जास्त झाल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली होती. त्याचबरोबर दिवाळीच्या आगोदर अजून एक मॉडेल बाजारात येणार असल्याचे सुद्धा सांगितले होते.
मागच्या आठदिवसांपुर्वी इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीने एका चिमुरड्याचा जीव घेतला. घरात बॅटरी चॅर्जिंगला लावली असताना, त्याचा अचानक स्फोट झाला. त्यावेळी हॉलमध्ये झोपलेल्या मुलाचा अधिक भाजल्याने मृत्यू झाला होता.