कॅफेमध्ये बसून मुलींनी सिगारेट पिणं आवडलं नाही, संतप्त वृद्धाने केलं असं काही की…

| Updated on: Oct 12, 2023 | 1:26 PM

मुलींनी सिगारेट ओढल्याने संतापलेल्या एका वृद्धाने असं पाऊल उचललं की त्यामुळे कॅफे चालकाला मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी वृद्धाला ताब्यात घेतले.

कॅफेमध्ये बसून मुलींनी सिगारेट पिणं आवडलं नाही, संतप्त वृद्धाने केलं असं काही की...
Follow us on

इंदूर | 12 ऑक्टोबर 2023 : सिगारेट (cigarette smoking) पिणं शरीरासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे. हे सर्वांनाच माहीत असलं तरी अनेक लोकं सिगारेट ओढतात. मात्र याच सिगारेटमुळे (cigarette) इंदूरमध्ये एक मोठा राडा झाला आहे. इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुली सिगारेट ओढत अल्याचे एका वृद्ध नागरिकाने पाहिलं. मात्र ते दृश्य पाहून त्याला इतक राग आला की त्याने असं कृत्य केलं, ज्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही.

त्याने सरळ कॅफेला आगच लावली. त्या आगीत कॅफे संपूर्ण भस्मसात झाला असून कॅफे मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आग लावणाऱ्या वृद्धाला शोधलं आणि ताब्यात घेतलं आहे. कॅफेला आग लावणारा हा इसम एक रिटायर्ड अधिकारी असल्याचे समजते. इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन परिसरातील हे धक्कादायक प्रकरण आहे.

या भागात स्कीम नंबर-78 मध्ये ‘स्टेट कॅफे’ नावाचा कॅफे आहे. कॅफेचे मालक शुभम चौधरी यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री त्यांच्या कॅफेला आग लागल्याची माहिती मिळाली. आगीमुळे कॅफेमधील सर्व सामान जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असे कॅफे चालकाला वाटले, पण त्याने सीसीटीव्ही तपासले तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला. रात्री उशिरा एका वृद्ध व्यक्ती त्याच्या कॅफेला आग लावत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते.

आरोपी वृद्धाला घेतले ताब्यात

याप्रकरणी कॅफे संचालक शुभम चौधरी यांनी पोलिसांत तक्रार केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये विजय माठे हे वृद्ध इसम कॅफेला आग लावत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. ते एक निवृ्त्त अधिकारी आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

मुली सिगारेट ओढतात हे आवडत नव्हतं

कॅफेला आग लावणाऱ्या विजय माठे यांची पोलिसांनी चौकशी केली. कॅफेमध्ये येणाऱ्या मुली इतर मुलांसोबत सिगारेट ओढत असतात. कॅफेमध्ये जे प्रकार घडतात, त्याचा आसपासच्या परिसरातील मुलांवर विपरीत परिणाम होतो. मुलीदेखील सिगारेट ओढत असतात. हे सर्व त्यांना आवडतं नव्हतं. मुलींनी असे ( सिगारेट ओढण्याचे) उद्योग करू नयेत, असं त्यांचं मत आहे. त्यामुळे रागावून त्यांनी कॅफेला आग लावली. सध्या ते पोलीस कोठडीत असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.