ओम बिर्ला विरुद्ध के.सुरेश, कशी होते लोकसभा अध्यक्षांची निवड, याआधी केव्हा झाली होती निवडणूक

| Updated on: Jun 25, 2024 | 7:16 PM

लोकसभा अध्यक्ष पदाची निवड यंदा सर्वानुमते बिनविरोध न होता. मतदानाने होणार आहे. त्यामुळे एनडीए सरकारची पहिला परिक्षा उद्या होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला आता येत्या वर्षात संसदेत काय होणार आहे याचा अंदाज आला असेल कारण विरोधकांचा आवाज या निवडणूकीत बुलंद झाला आहे.

ओम बिर्ला विरुद्ध के.सुरेश, कशी होते लोकसभा अध्यक्षांची निवड, याआधी केव्हा झाली होती निवडणूक
om birla and k.suresh
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

18 लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आदींची निवड करण्यासाठी संसदेचे अधिवेशन सुरु आहे. एनडीएने पुन्हा ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्ष पदासाठी उतरविले आहे. तर विरोधकांनीही यंदा या पदासाठी के. सुरेश यांना उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. 26 जूनला लोकसभा अध्यक्ष पदासाठी आता मतदान होणार आहे. परंतू सर्वसाधारणपणे लोकसभा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड होणे अपेक्षित असते. परंतू यंदा कॉंग्रेसने गेल्या दहा वर्षांतील भाजपाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी हा संसदीय पर्याय निवडला आहे. आम्हाला तुम्ही गेली दहा वर्षे लोकसभेचे उपाध्यक्ष मागूनही दिले नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला अध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिलेला नाही असे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या कृतीतून एनडीएला सुचवायचे आहे. भलेही आमचा या निवडणूकीत पराभव होईल, परंतू संविधानाने दिलेला हक्क आम्ही वापरणार असे राहुल गांधी यांना सुचवायचे आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना फोन आला होता. त्यांनी लोकसभा अध्यक्ष निवडणूकीसाठी आम्हाला पाठिंबा द्या अशी विनंती केल्याचे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. विरोधी पक्षाने स्पष्टपणे सांगितले की आम्ही लोकसभा अध्यक्ष पदासाठी पाठींबा देतो आम्हाला उपाध्यक्ष पद द्या असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह यांनी मल्लिकार्जून खरगे यांना पुन्हा उद्या रिर्टन कॉल करतो असे सांगितले, परंतू त्यांचा काही कॉल आलेला नाही. पंतप्रधान म्हणत आहेत की सहकार्य करा, परंतू आमच्या नेत्यांचा अपमान केला जात आहे. सरकारची नियम काही साफ दिसत नसल्याचे यातून दिसते असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

घटनेच्या परिशिष्ट 93 मध्ये लोकसभा अध्यक्ष पदाबाबत उल्लेख केलेला आहे. नवीन लोकसभा गठीत झाली के लोकसभा अध्यक्ष पद रिकामे होते. आणि निवडून आलेल्या नव्या खासदाराच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती प्रोटेम स्पीकर नियुक्त करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे लोकसभा अध्यक्ष पद बहुमताने निवडले जाते. एकूण लोकसभा सदस्याच्या संख्येत जाला जास्त मते मिळतात त्याची निवड लोकसभा अध्यक्ष पदासाठी होते.

गेल्यावेळी केव्हा झाली होती निवडणूक

15 मे 1952 रोजी पहिल्या लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली होती. या पदासाठी सत्ताधारी पक्षाचे जी.व्ही. मावळकर उमेदवार होते. त्यांच्या विरोधात शंकर शांताराम मोरे होते. मावळकर याच्या बाजूने 394 मते तर विरोधात 55 मते पडली. अशा प्रकारे मावळकर देशाचे पहिले लोकसभा अध्यक्ष झाले. तर स्वातंत्र्यापूर्वी सेंट्र्रल लेजिस्लेटिव्ह म्हणजेच इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह काऊन्सिलच्या खालच्या सभागृहातील स्पीकरसाठी 1925 मध्ये निवडणूक झाली होती. 1925 पासून ते 1946 पर्यंत सेंट्रल लेजिस्लेटिव्ह एसेंबली स्पीकर ( अध्यक्ष ) पदासाठी सहा वेळा निवडणूका झाल्या आहेत.

यंदा विरोधकांना जादा बळ मिळाले

एनडीएच्याकडे सध्या 293 खासदाराचे बळ आहे. तर विरोधकांचा आकडाही यंदा वाढला आहे. इंडिया आघाडीकडे 234 खासदाकराची कुमक आहे. आतापर्यंत लोकसभेचे स्पीकर पद ( अध्यक्ष ) सत्ताधारी पक्षाला मिळत होते. त्यास विरोधकांचाही पाठींबा असायचा. तर उपाध्यक्ष पद विरोधकांना मिळायचे. त्यामुळे सत्तेचा समतोल राखला जायचा. परंतू या टर्मला देखील एनडीए विरोधकांना उपाध्यक्ष पद द्यायला तयार नसल्याने विरोधांनी अध्यक्ष पदाच्या नियुक्तीला सत्ताधारी पक्षाला पाठींबा न देता ओम बिर्ला यांच्या विरोधात आपले उमेदवार के. सुरेश यांना उभे केले आहे. उद्या 26 जून रोजी या पदासाठी निवडणूक असून एनडीएला बहुमत सिद्ध करायला काहीही अडचण येणार नसल्याचे म्हटले जात आहे.