मनीष सिसोदिया यांच्या सुटकेसाठी ‘या’ मुख्यमंत्र्यांची थेट पंतप्रधानाकडे धाव; केंद्रामुळे देशातील लोकशाही धोक्यात…

| Updated on: Mar 08, 2023 | 12:29 AM

काँग्रेसकडूनही दारू घोटाळ्याबाबत सातत्याने आपवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणात ते इतर विरोधी पक्षही अलिप्तपणे आपली भूमिका स्पष्ट करू लागल्या आहेत.

मनीष सिसोदिया यांच्या सुटकेसाठी या मुख्यमंत्र्यांची थेट पंतप्रधानाकडे धाव; केंद्रामुळे देशातील लोकशाही धोक्यात...
Follow us on

नवी दिल्लीः तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या बिनशर्त सुटकेची मागणी केली आहे.स्टॅलिन यांनी त्या पत्रात म्हणाले आहेत की,राज्यपाल कार्यालयासह तपास यंत्रणांचा गैरवापर भारतातील श्रेष्ठ असणाऱ्या लोकशाहीला कधीही मजबूत करू शकत नाही. मनीष सिसोदिया यांना दिल्लीच्या अबकारी धोरणाबाबत त्यांना अटक करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीच्या या नेत्याला सोमवारी सीबीआय कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आली होती.

सध्या सिसोदिया तिहार तुरुंगात बंदिस्त आहेत.मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी तुरुंगामध्ये त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली.

केंद्र सरकार वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याच्या योग्य प्रक्रियेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आला आहे.

मोदी सरकारवर आरोप करताना त्यांनी सांगितले की, नऊ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने विरोधी पक्षांच्या राजकीय नेत्यांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला आहे.

काँग्रेसकडूनही दारू घोटाळ्याबाबत सातत्याने आपवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणात ते इतर विरोधी पक्षही अलिप्तपणे आपली भूमिका स्पष्ट करू लागल्या आहेत. अशा परिस्थितीतही त्यांच्या पक्षाचे सहकारी स्टॅलिन काँग्रेसला पाठिंबा न देता आपच्या बाजूने उभा राहिले आहेत.

स्टॅलिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझ्या मताशी सहमत असणार आहे. भिन्न विचारधारा आणि राजकीय पक्ष हे भारतीय लोकशाहीमधील दोन महत्वाचे घटक आहेत.

ते म्हणाले की, मनीष सिसोदिया यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे समजल्यापासून मी निराश झालो आहे. या प्रकरणात त्यांचा विनाकारण छळ केला जातो आहे.