नवी दिल्ली : भारतात (India) छोट्या-मोठ्या एकूण 400 पेक्षा अधिक नद्या (Rivers) आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेतही नद्यांचं मोठं योगदान आहे. सामान्यपणे नद्या डोंगरात उगम पावतात आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. उदाहरण म्हणून पाहायचं ठरलं तर गंगोत्री (Gangotri) येथून उगम पावलेली गंगा नदी (Ganga River) बंगालच्या खाडीत (Bay of Bengal) जाऊन हिंद महासागराला (Indian Ocean) मिळते. अशी प्रत्येक नदी शेवटी समुद्राला जाऊन मिळते. मात्र, भारतात एक अशीही नदी आहे जी समुद्राला मिळत नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही कोणती नदी आहे आणि असं का होतं? तर याच प्रश्नांची उत्तर समजून घेऊयात (One and only River of India which start from mountain but not end with sea).
राजस्थानमधील अजमेर येथून निघणारी लुनी नदी देशातील अशी एकमेव नदी आहे जिचा कोणत्याही समुद्राशी संगम होत नाही. लुनी नदीचा उगम अजमेरमध्ये जवळपास 772 मीटर उंचीवर अरावली पर्वतरांगेतील नाग डोंगरावर होतो. 495 किलोमीटर लांबीची ही नदी आपल्या मार्गात मोठ्या प्रमाणात जमीन सिंचित करुन थेट गुजरातला पोहचणारी एकमेव नदी आहे. राजस्थानमध्ये या नदीची लांबी 330 किलोमीटर आहे. या नदीचा उर्वरित भाग गुजरातमध्ये येतो. लुनी नदी राजस्थानच्या अजमेरमधून निघून नागौर, जोधपूर, पाली, बाडमेर, जालौरमधून गुजरातच्या कच्छला पोहचते. ही नदी समुद्राला न मिळता कच्छच्या वाळवंटासोबत मिसळून जाते.
लुनी नदीचं वैशिष्ट्ये म्हणजे अजमेरपासून बाडमेरपर्यंत या नदीचं पाणी गोड आहे. मात्र, तेथून पुढे गेल्यावर नदीचं पाणी प्रचंड खारं होतं. यामागील प्रमुख कारण आहे राजस्थानमधून वाहताना तेथील वाळवंटातून मिठाचे कण पाण्यात मिसळतात. त्यामुळे नंतरपुढे जाऊ गुजरातमध्ये या नदीचं पाणी प्रचंड खारं होतं. नदीच्या खाऱ्या पाण्यामुळेच या नदीला लुनी नदी असं नाव देण्यात आलंय. लुनी हे नाव संस्कृतच्या लवणगिरी शब्दापासून घेण्यात आल्याचं सांगितलं जातं. लवणगिरीचा अर्थ खाऱ्या पाण्याची नदी असा होय. लुनी नदीच्या अनेक उपनद्या आहेत. यात मिठडी, लीलडी, जवाई, सुकरी, बांडी, खारी आणि जोजारी या नद्यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
One and only River of India which start from mountain but not end with sea