ओडिशा सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सरकारी आणि प्रायव्हेट, दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिलांना कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’ लागू केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर महिलांना आनंद देणारा हा निर्णय घेण्यात आला आहे. या सुट्टीचा उद्देश्य मासिक पाळी ( Menstrual Leave) दरम्यान महिलांना होणाऱ्या शारीरिक मानसिक आव्हानांना लक्षात घेऊन घेण्यात आला असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री परिदा यांनी सांगितले की आज आपण स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करीत आहोत. आमचे सरकार महिलांसाठी एक असे पाऊल उचलत आहे ज्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी सहानुभूती आणि पाठिंबा मिळेल. सरकारचे हे धोरण महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी एक महत्वाचा निर्णय आहे. त्यापुढे म्हणाल्या की महिला कर्मचारी आपल्या पीरियड्सच्या एक दिवस आधी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांच्या आवश्यकतेनूसार एक दिवसांची सुटी घेऊ शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हा निर्णय तातडीने लागू झाला असल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी सांगितले. हा एक चांगला पायंडा पाडणारा निर्णय आहे. ओडिशा हे राज्य मासिक धर्म समानता Menstrual Equity च्या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणारे ठरणार आहे. या मोहीमेचा उद्देश्य महिलासाठी एक कलेक्टीव आणि कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण करण्याचा आहे. महिला आत्मसन्मानाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार असून सरकारचा हा निर्णय जगाला देखील प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओदिशा सरकारच्या या निर्णयाचे महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि आरोग्य तज्ज्ञांकडून स्वागत करण्यात आले आहे.