नवी दिल्ली : नवी दिल्ली : आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर राजधानीत ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप केलाय. केजरीवाल यांच्या मते, भाजपनं दिल्लीत सरकार (Delhi Government) पाडण्याचा प्रयत्न केला. सीबीआय (CBI) छापे हा भाजपचा कट होता. दिल्लीत दारु घोटाळ्याची तपासणी होत आहे. त्यामुळं आम आदमी पक्ष ( Aam Party) आणि भारतीय जनता पक्षात तेढ निर्माण होत आहे. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानी दिल्लीत ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप केला. दिल्लीत सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला. यामुळं पुन्हा भाजपच्या ऑपरेशनट लोटसची चर्चा सुरू झाली.
दिल्ली में ऑपरेशन लोटस फेल https://t.co/y8XBCSPS0d
हे सुद्धा वाचा— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 22, 2022
अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केलंय की, दिल्लीत ऑपरेशन लोटस फेल झालं. याचा अर्थ सीबीआय, ईडी रेडचा दारू आणि भ्रष्टाचार प्रकरणाशी काहीही घेणंदेणं नाही. असाच ईडीचा वापर दुसऱ्या राज्यात करण्यात आला. मनीष सिसोदिया यांनी भाजपवर आरोप केला होता की, भाजपकडून सीएम पदाची ऑफर होती. पक्षात फूट पाडल्यास त्यांच्यावरील आरोप परत घेतले जातील, असं सिसोदिया यांना सांगण्यात आलं होतं. यासंदर्भात सिसोदिया यांनी म्हटलं होतं की, आपमध्ये फूट पाडून भाजपात यावं. सीबीआय, ईडीच्या केसेस बंद केल्या जातील. यावर सिसोदिया म्हणाले की, मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे. राजपूत आहे. भ्रष्टाचाऱ्यांसोर झुकणार नाही. माझ्याविरोधात असलेल्या सर्व केसेस खोट्या आहेत.
सिसोदिया म्हणाले की, त्यांच्याकडं भाजप नेत्यानं दिलेल्या ऑफरची रेकॉर्डिंग आहे. वेळ आल्यासं ती रेकॉर्डिंग सर्वांसमोर आणणार आहे. मनोज तिवारी म्हणाले की, सिसोदिया यांचा फोन सीबीआयजवळ आहे. मग रेकॉर्डिंग सिसोदिया यांच्याकडं कसं आहे.
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया आज गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमधूनचं भाजपवर हल्ला केला जात आहे. दारु घोटाळ्यावर बोललं जातंय. भ्रष्टाचारावरही प्रहार केला जातोय. केजरीवाल म्हणाले, आम्ही दारुबंदीच्या धोरणाला सुरूच ठेऊ. पण, अवैधरित्या दारुचा धंदा सुरू ठेवणार नाही. 850 दारुची दुकानं सुरू होणार होती. 500 दुकानं सुरू झालीत. केंद्राच्या दबावामुळं अधिकारी लीलावासाठी मनाई करत आहेत.