पणजी: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मुंबईचा दादा शिवसेनाच (shiv sena) असल्याचं विधान केलं. तसेच आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणंही त्यांना मुश्किल होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी पलटवार केला आहे. शेर कभी गिदड धमकी से डरा नही करते, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. रोज सकाळी येऊन ते मनोरंजन करत असतात. संपादक असल्याने चर्चेत राहण्यासाठी काय विधाने केली पाहिजे हे त्यांना माहीत आहे, असं सांगतानाच राऊत यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन म्हणणं मांडावं, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
ईडी काय करते हे ईडी सांगेल. ते का करतात तेही ईडी सांगेल. संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जे वक्तव्य आहे तो व्हिक्टिम कार्डचा एक भाग आहे. त्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन मांडावं, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
राऊत रोज सकाळी 9 वाजता येऊन मनोरंजन करत असतात. त्यांच्या म्हणण्याला अधिक गांभीर्याने घ्यायची गरज नाही. मोदी सरकारने कुणाला व्हिक्टिमाईज केलं नाही. मोदी सरकारमध्ये असं कधी होत नाही. त्यांनी व्हिक्टिम कार्ड खेळू नये, राऊत हे संपादक आहेत. हेडलाईन कशी द्यावी हे त्यांना माहीत आहे. दिवसभर आपल्यावर फोकस कसा राहील, आपलं नाव चर्चेत कसे राहील याप्रकारचे काम ते करत असतात, असंही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची स्तुती केली होती. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी असं समीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणतंही नवीन समीकरण नाही. भाजप महाराष्ट्रात विरोधी पक्षात राहूनच काम करेल. पूर्ण शक्तीने आमच्या मेजोरिटीने आम्ही राज्यात सरकार स्थापन करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसचा त्यांच्या लोकांवर विश्वास राहिलेला नाही. भाजपला कोणाला शपथ देण्याची गरज नाही. प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही. काँग्रेस कमकुवत झाली आहे. त्यांच्या केंद्रीय नेत्यांपासून गल्लीतल्या नेत्यांपर्यंत कोणीच कुणाचं ऐकत नाही. पक्षात कुणाचा पायपोस कुणात नाही. त्यामुळे ते कमकुवत झाले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
लता मंगेशकर यांच्या स्मारकावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. लतादीदी महान होत्या. त्यांच्या स्मारकाचा वाद होऊ नये. सर्वांनी मिळून त्यांचं चांगलं स्मारक निर्माण केलं पाहिजे. राज्यातील सरकार स्मारक करणार असेल तर काँग्रेस त्याला पाठिंबा देणार का? असा सवाल करतानाच काँग्रेसचा एकही नेता लतादीदीच्या अंत्यविधीला उपस्थित नसल्याने हा प्रश्न पडल्याचं त्यांनी सांगितलं.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 9 February 2022 pic.twitter.com/MX086IceXK
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2022
संबंधित बातम्या:
Nashik Murder Mystery | डॉ. सुवर्णा वाजे जळीत कांड; पतीच्या 3 मित्रांची चौकशी, पण शेवटचा मोहरा बाकी!