मुंबई : ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीवरून ऑर्डर मागवताना बऱ्याच सवलती मिळतात. त्यामुळे ग्राहकांना कमी पैशात चांगल्या पदार्थांची चव चाखता येते. त्यामुळे स्विगी हे लोकप्रिय अॅप आहे. कंपनीच्या या प्लॅटफॉर्मवर 2.5 लाखांहून अधिक रेस्टॉरंटची नोंदणी आहे. तसेच महिन्याकाठी 10 हजार हॉटेल आपली नोंदणी करतात. तसेच या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगार प्राप्त झाला आहे. पण आता या प्लॅटफॉर्मवरून जेवण मागवणं थोडं महागात पडणार आहे.
आता ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी कंपनीने कार्ट व्हॅल्यू व्यतिरिक्त सर्व युजर्सकडून प्रति फूड ऑर्डरसाठी 2 रुपये प्लॅटफॉर्म फी वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेकांना अतिरिक्त पैसे का मोजतो असा प्रश्न पडला आहे. स्विगी युजर्स आतापर्यंत फूड ऑर्डर करण्यावर डिलिव्हरी फीस आणि टॅक्स भरतात.
कंपनीने याबाबत सांगितलं की, फक्त मुख्य प्लॅटफॉर्मवर फूड ऑर्डर केलं अतिरिक्त चार्ज लावला जात आहे. हा भार इंस्टामार्ट युजर्ससाठी लागू नाही. स्विगीच्या प्रवक्त्यांनी या अतिरिक्त चार्जबाबत आपलं मत मांडलं आहे.
“फूड ऑर्डवर प्लॅटफॉर्म फीस एक साधारण शुल्क आहे. हे शुल्कामुळे आम्ही प्लॅटफॉर्म व्यवस्थितरित्या संचालित करणं आणि चांगलं अपग्रेड करण्यासाठी मदत होणार आहे. तसेच काही अखंडीतपणे सेवा प्रदान करण्यास मदत करते.”, असं स्विगी प्रवक्त्यांनी सांगितलं. स्विगीने हे अतिरिक्त शुल्क बंगळुरु आणि हैदराबाद सारख्या शहरात लागू केलं आहे. सध्या तरी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरात ही अतिरिक्त फी लागू नाही.
स्विगीला 2 रुपये कमी वाटत असले तरी स्विगीला दररोज लाखो ऑर्डर येतात. यामुळे मोठी रक्कम जमा होऊ सकते. ही फीस मागच्या आठवड्यात लागू केली होती. लवकरच सर्व शहरं आणि काही भागांमध्ये लागू केली जाऊ शकते.
एका रिपोर्टनुसार स्विगीला दिवसाला 1.5 ते 2 मिलियन हून अधिक ऑर्डर मिळतात. रमजानच्या पवित्र महिन्यात हैदराबादमध्ये तर स्विगीवरून 10 लाख प्लेट बिर्याणी आणि 4 लाख प्लेट हलीम ऑर्डर केली गेली.
गेल्या 12 महिन्यांच्या कालावधीत 33 मिलियन प्लेट इडलीची डिलिव्हरी केली आहे. त्यामुळे या पदार्थाची लोकप्रियता दिसून येते. बंगळुरु, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये सर्वाधिक इडलीची ऑर्डर केली गेली.