हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पीएफआयवर बंदीची कारवाई केल्यानंतर दहशतवादी कारवायांना ऊत येण्याची शक्यता असल्यानेच मोठ्या शहरातील बंदोबस्त वाढवण्यात आला होता. हैदराबादमध्येही (Hyderabad) मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असतानाच पोलिसांनी पाकिस्तानचा(Pakistan) मोठा कट उधळून लावला आहे. हैदराबादमध्ये पोलिसांनी तिघांना अटक (3 Arrested) केली असून त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. ज्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे, ते तिघंही गर्दीच्या ठिकाणी ग्रेनेड फेकण्याच्या तयारीत होते.
हैदराबाद पोलिसांनी या तिघांनाही जिवंत ग्रेनेडसह अटक केली गेली आहे. अब्दुल जाहेद, मोहम्मद समीउद्दीन आणि मज हसन फारूख अशी या तिघांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, यामधील एक अब्दुल जाहेद यापूर्वीही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला होता. याशिवाय तो आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाच्याही नियमित संपर्कात होता असंही पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात जाहेदला हँडग्रेनेड हे पाकिस्तानातील हस्तकांकडून मिळाले होते असंही सांगण्यात आले आहे.
जाहेदला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याच गटातील एका व्यक्तीकडून सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी लक्ष्य करुन गर्दीच्या ठिकाणी हँडग्रेनेड फेकण्याचा त्याचा कट होता. या घटनेमुळे शहरात आणि नागरी समुहांमध्ये दहशत आणि जातीय तणाव निर्माण केला जाण्याचा प्रयत्न केला जात होता.
तर दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्येही दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडू कडक कारवाई केली जात आहे. या दरम्यान, रविवारी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला असून एक सीआरपीएफचा जवानही जखमी झाला आहे.
याआधी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानवर टीका करताना म्हटले होते की, पाकिस्तानसारखा दहशतवाद इतर कोणताही देश दहशतवाद पसरवत नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या मुत्सद्देगिरीमुळे इतर देशांना दहशतवादाचा मुद्दा गांभीर्याने घेण्यास भाग पडले आहे.
कार्यक्रमानंतर संवाद साधताना जयशंकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षात पाकिस्तानने भारताविरुद्ध जे काही कटकारस्थान केली आहेत.
ती गंभीर आहेत. ज्यावेळी मुंबईत 26/11 सारखी दुर्घटना घडली त्यावेळीच येथील सुरक्षा व्यवस्था आणि भारत सरकारने स्पष्ट केले होते, की, या प्रकारच्या गोष्टी आणि वर्तन पाकिस्तानसह कोणत्याच देशांकडून अपेक्षित नाहीत. आणि असे हल्ले झाले तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असंही त्यांनी सांगितले.