पाकिस्तानने समुद्रामार्गे भारतात पाठवले 350 कोटींचे ड्रग्ज, अशी झाली कारवाई

| Updated on: Oct 08, 2022 | 4:46 PM

पाकिस्तानातून समुद्रामार्गे येणार ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई करण्यासाठी तटरक्षक दलाने...

पाकिस्तानने समुद्रामार्गे भारतात पाठवले 350 कोटींचे ड्रग्ज, अशी झाली कारवाई
ड्रग्स
Image Credit source: Social Media
Follow us on

गांधीनगर,  पाकिस्तानची (Pakistan) कुरघोडी पुन्हा एकदा समोर आली आहे. समुद्रामार्गे तस्करी (Drugs Smuggling) करून पाठवत असलेले तब्बल 350 कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे.   भारतीय तटरक्षक दलाने गुजरात (Gujrat) किनारपट्टीपासून 50 किमी अंतरावरील आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ ‘अल सकार’ (Al Sakar) या पाकिस्तानी बोटीला पकडून सुमारे 350 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात केले. या बोटीत 6 पाकिस्तानी लोकं होते. त्यांच्याकडून 50 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. गुजरात पोलिसांचे डीजीपी आशिष भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये राहणारा एक मोठा ड्रग पॅडलर  मोहम्मद कादर याने येथे हेरॉइनची खेप पाठवली होती, अशी माहिती मिळाली होती.

समुद्रातच होणार होता व्यवहार

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या मालाचा व्यवहार  समुद्रातच होणार होता. ही माहिती मिळाल्यानंतर गुजरात एटीएसने मोठी कारवाई सुरू करत या लोकांना अटक केली. गुजरातच्या डीजीपीने दिलेल्या माहितीनुसार  या कारवाईत  एकूण 6 पाकिस्तानी ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या लोकांसह तटरक्षक दल आणि पोलिसांचे पथक जाखाऊ बंदरावर पोहोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एटीएसने इतर एजन्सींच्या सहकार्याने केलेली ही गेल्या काही वर्षांतील सहावी कारवाई आहे.

पंजाबनंतर आता गुजरात सीमेवरून तस्करी

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांत गुजरातमधील काही बंदरांवरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची खेप जप्त करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबसारख्या राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कडक कारवाया केल्या जात आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे आता गुजरातच्या सागरी सीमेवर अमली पदार्थांच्या तस्करांनी आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. पंजाबमध्ये कडक कारवाई करत पोलिसांनी 400 ड्रग्ज विक्रेत्यांना तुरुंगात पाठवले आहे. यानंतर पाकिस्तानात बसलेल्या दहशतवादी आणि ड्रग्ज विक्रेत्यांनी ड्रग्जची खेप समुद्रमार्गे गुजरातसह महाराष्ट्रात पाठवण्याचे काम तीव्र केले आहे.