मुंबई : सध्या सीमा हैदर हे नाव देशात फार चर्चेत असलेलं पाहायला मिळत आहे. एखाद्या चित्रपटाच्या लाजवेल अशी कथा आणि योगायोग तिने सांगितल्यानुसार झाला आहे. मात्र सीमाने सांगितलेलं सर्व काही सत्य आहे का? इतकंच नाहीतर आपण ती एक पाकिस्तानी आहे म्हणून तिच्यावर शंका उपस्थित केली आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र देशाच्या सुरक्षा महत्त्वाची त्यानंतर सर्व काही, काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे सीमावरील संशय आणखी वाढला आहे. एकंदरित तिने माध्यमांशी संवाद साधताना वापरलेले इंग्रजी शब्द विचार करायला लावणारे आहेत. कारण सीमा पाचवी शिकली असल्याचं तिने सांगितलं आहे. त्यामुळे सीमा हैदरला यूपी एटीएसने ताब्यात घेतलं आहे. तपासामध्ये खाली दिलेले प्रश्न तिला हमखास विचारले गेले असतील.
सीमा सचिनला पहिल्यांदा कधी भेटली आणि कशी घडली?
दोघे खरोखरच पहिल्यांदा PUBG वर भेटले होते का?
सचिनला भेटण्यापूर्वी सीमाचं सत्य काय होतं?
सचिनला पहिल्यांदा भेटून भारतात येईपर्यंत सीमाने कोणते मोबाईल नंबर वापरले होते?
सीमाचे सोशल मीडियावर अकाऊंट कुठे आहेत?
दोघांच्या WhatsApp चॅटमध्ये काय आहे?
सीमाने पाकिस्तानातील घर विकले याचा पुरावा काय?
कराची ते शारजा आणि शारजा ते काठमांडू या प्रवासाची नेमकं सत्य काय आहे?
काठमांडूमध्ये सचिनसोबत सीमा कोणत्या हॉटेलमध्ये राहिली होती
काठमांडूच्या कोणत्या मंदिरात आणि दोघांचे लग्न कधी झाले?
सचिनला भेटल्यावर सीमाने हिंदी सुधारली की आधीच?
काय आहे सचिन आणि तिचा पहिला पती गुलाम हैदरचं सत्य?
पाकिस्तानमध्ये असताना सीमा पाक एजन्सीच्या संपर्कात होती का?
सीमा गेल्या काही वर्षांत कोणते मोबाइल नंबर वापरत होती?
सचिनच्या आधीही सीमाचे PUBG किंवा इतर गेमिंग अॅप्सवर कोणी मित्र होते का?
सचिनसोडून सीमाचे भारतात आणखी कोणी मित्र आहेत का?
दरम्यान, सीमा जामिनावर बाहेर आली होती. त्यावेळी तिला घर सोडून कुठेही जाण्याची परवनगी नाही. युपी एटीसवाल्यांनी सांगितलं आहे की, तिचा तपास झाल्यावर त्यासंदर्भातील अहवाल लखनऊ पोलीस मुख्यालायमध्ये सादर केला जाणार आहे. त्यानंतर हा अहवाल दिल्ली गृह मंत्रालयात पाठवला जाईल.