नवी दिल्ली : भारतात कुरापती करण्यापासून पाकिस्तान काही शांत राहत नाही. देशातील वातावरण खराब कसं होईल, येथील शांतता कशी भंग होईल याकडेच पाकिस्तानचे अधिक लक्ष असते. मध्यंतरी पाकिस्तानात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून तेथे जनता रस्त्यावर उतरली आहे. त्याकडे लक्ष देण्याऐवजी भारतात कुरापती करण्यातच पाकिस्तान धन्यता मानताना दिसत आहे. तर देशात भोंग्यावरून राजकारण तापलेले असताना येथील मुस्लिम समाजावर अत्याचार केले जात असल्याची गरळ पाकिस्तानने आधीच ओकली होती. त्यानंतर आता पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI)ने भारताविरोधात नवीन कट रचण्याचे कळत आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या (Pakistani Terrorists) निशाण्यावर पंजाबमधील रेल्वे सेवा असल्याचे कळत आहे. ISI चा रेल्वे ट्रॅक उडवण्याचा प्लॅन असल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे रेल्वे खात्यालाही (India Railway) अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ISIकडून पंजाब आणि लगतच्या राज्यातील रेल्वे निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. तर काही दिवसआधीच पंजाबमधील मोहाली येथील पोलीस महासंचालकांच्या कार्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) हल्ला करण्यात आला होता. ज्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाच्या इमारतीचे मोठे नुसकान झाले होते. त्याप्ररकणी पोलिसांनी तपासही सुरू केला होता. तरचार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानच्या ISIसंदर्भात अलर्ट जारी केला आहे. पंजाब आणि लगतच्या राज्यांतील रेल्वेंना लक्ष केले जाईल असे सांगितले आहे. तर ISI कडून येथील रेल्वे ट्रॅक उखडण्याचा मोठा कट असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच अहवालानुसार, एजन्सींचे म्हणणे आहे की, मालगाड्यांना लक्ष्य करण्यासाठी ट्रॅक उडवून देण्याची योजना आखली जात आहे. त्यासाठी स्लीपर सेलला मोठी रक्कम ऑफर करण्यात आली आहे. त्यामुळे पंजाबसह आजूबाजूच्या राज्यांना अलर्ट राहण्याच्या सुचना गुप्तचर यंत्रणांनी दिल्या आहेत.
पाकिस्तान दीर्घकाळापासून पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच राज्यात अनेक बॉम्बस्फोट झाले असून, त्यात अनेक पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटासाठी त्याने ड्रोनच्या मदतीने स्फोटक साहित्य पुरवले होते. याशिवाय मोहालीत पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर या महिन्यात झालेल्या हल्ल्याचे तारही पाकिस्तानशी संबंधित आहेत.
पाकिस्तानच्या या कारवायांमुळे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुप्तचर यंत्रणांनी काश्मीरपेक्षा पंजाबमधील परिस्थिती अधिक नाजूक असल्याचे म्हटले होते. तसेच अलर्टचा इशारा दिला होता. तर राज्यात फेब्रुवारीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. एजन्सींनी पंजाब पोलिसांना संवेदनशील प्रतिष्ठानांवर सुरक्षा वाढवण्यास आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा रोखण्यासाठी सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते.