PM Narendra Modi full speech highlights : शेतकरी आंदोलन, शरद पवार ते मनमोहन सिंह, मोदींचं संपूर्ण भाषण

| Updated on: Apr 15, 2021 | 3:47 PM

Parliament Session PM Narendra Modi Live पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

PM Narendra Modi full speech highlights : शेतकरी आंदोलन, शरद पवार ते मनमोहन सिंह, मोदींचं संपूर्ण भाषण
Narendra Modi Live
Follow us on

Parliament Session PM Narendra Modi Live : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनावरु सभागृहात भाष्य केलं. कृषी कायद्याबाबत सभागृहात सविस्तर चर्चा का नाही? असा सवाल मोदींनी विरोधकांना विचारला. MSP होता, आहे आणि राहील , असं मोदींनी ठणकावून सांगितलं. 

आम्ही, कृषीमंत्री शेतकरी आंदोलकांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा सुरु आहेत, मिळून मिसळून चर्चा करु, वृद्ध शेतकऱ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये, आज मी संसदेतूनही आवाहन करतो, चर्चेने मार्ग काढू, तुम्हाला लोकशाहीत आंदोलनाचा हक्क आहे, आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचं आहे, मागे नाही, असं मोदींनी नमूद केलं.

Key Events

मैथिली शरण गुप्त यांची कविता मोदींकडून संसदेत सादर

अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चुपचाप पडा है, तेरा कर्मक्षेत्र बडा है, पलपल है अनमोल, अरे भारत उठ, आँखे खोल,
अवसर तेरे लिए खडा है, तू आत्मविश्वास से भरा पडा है, हर बाधा, हर बंदीश को तोड, अरे भारत आत्मनिर्भरता के पथपर दौड

बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदींच्या भाषणात बंगालचा उल्लेख

बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदींच्या भाषणात बंगालचा उल्लेख, तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आठवण, भारताचा राष्ट्रवाद हा सत्यम, शिवम, सुंदरम, हे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटलं होतं, पण आपण नेताजींच्या आदर्शांना विसरलोत

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Feb 2021 12:16 PM (IST)

    Watch PM Narendra Modi Rajya Sabha Full Speech | पंतप्रधान मोदी यांचं संपूर्ण भाषण

  • 08 Feb 2021 11:53 AM (IST)

    2047 साठी देश तयार होत आहे – मोदी

    “मी एकटा नाहीं, मी एकटा नाही. मी माझ्यासोबत करोडो लोकांना पाहतो, त्यामुळे माझ्यात करोडो लोकांची शक्ती आहे, करोडो लोकांची दृष्टी आहे, कर्मशक्तीही आहे”,  वेदांतील या विचाराने भारत 130 कोटी देशवासियांसोबत प्केरगती करत आहे,  2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्यांचं शतक गाठेल तेव्हासाठी भारत तयार होत आहे


  • 08 Feb 2021 11:52 AM (IST)

    PM Narendra Modi Live : मोदी है मौका लिजिए : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    तुमच्या मनात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे राग असेल, तो माझ्यावर काढला, त्यामुळे तुमचं मन हलकं झालं, माझ्यामुळे तुम्हाला आनंद मिळत असेल, जर मी त्यासाठी कामी आलो तर ते ही माझं सौभाग्य आहे, हा आनंद घ्या, चर्चा करा, मोदी आहे मौका मिळत असेल तर घ्या, मोदी है मौका लिजिए असं मोदी म्हणाले

  • 08 Feb 2021 11:48 AM (IST)

    कठीण काळातही जवान देशासाठी उभा होता – मोदी

    कोरोनाच्या काळात सीमेवर आव्हान देण्याचा प्रयत्न झाला, पण आमच्या वीर जवानांनी वीरतेने आणि कुशलतेने अचूक उत्तर दिलं, सर्व भारतीयांनी आपल्या जवानांवर गर्व असायला हवा, कठीण काळातही जवान देशासाठी उभा होता

  • 08 Feb 2021 11:46 AM (IST)

    गुलाम नबी आझाद यांनी कौतुक केलं, पण मला भीती वाटते… – मोदी

    गुलाब नबी आझाद यांनी जम्मू- काश्मीरच्या निवडणुकांसाठी कौतुक केलं, ते नेहमी नम्रपणे बोलतात, कधीही कुठल्या अपशब्दाचा वापर करत नाही, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, संपूर्ण देशाच्या मनात जम्मू-काश्मीर, गुलाम नबी आझाद यांनी कौतुक केलं, पण मला भीती वाटते की तुम्ही कौतुक केलं पण, तुमच्या पक्षाचे लोक याला उचित स्पिरीटमध्ये घेतील, चुकीने जी-२३ चा सल्ला घेऊन उलट करायला नको, पंतप्रधानांच्या या टोमण्याने मभागृहात एकच हशा पिकला,

  • 08 Feb 2021 11:45 AM (IST)

    PM Narendra Modi on Ghulam Nabi Azad | गुलाम नबी आझाद यांचे धन्यवाद

    गुलाम नबी आझाद हे कधीही कटुतेने बोलत नाहीत, सर्व खासदारांनी त्यांच्याकडून हे शिकायला हवं, जम्मू काश्मीरमधील निवडणुकांचं त्यांनी कौतुक केलं. जम्मू काश्मीर आत्मनिर्भर होईल, त्याचं कौतुक गुलाम नबी आझादांनी केलं, मात्र मला भीती आहे की त्यांचा पक्ष काँग्रेस जी २३ ची मागणी करतील

  • 08 Feb 2021 11:39 AM (IST)

    दिशाभूल करणाऱ्या परदेशींपासून सावध राहा : मोदी

    देशात एक नवा एफडीआय, फॉरेन डिस्ट्रक्विव आयडॉलॉजी, देशानं यांच्यापासून स्वत:ला वाचवायला हवं, दिशाभूल करणाऱ्यां परदेशींपासून सावध राहा : मोदी

  • 08 Feb 2021 11:38 AM (IST)

    PM Narendra Modi Agitators : देशात नवी जमात – आंदोलनजीवी

    गेल्या काही काळापासून ह्या देशात नवी बिरादारी समोर आलीय, ती आहे आंदोलनजीवी, कुठलेही आंदोलन असेल हे तिथं पोहोचतात, वकिलांचं असो, स्टुडंटसचं कुठेही आंदोलन असेल तिथं पोहोचतात, देशानं ह्या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात, ज्यांचं ज्यांचं सरकार आहे त्या सगळ्यांना ह्या आंदोलनजीवी, परजीवींचा अनुभव येतो

  • 08 Feb 2021 11:36 AM (IST)

    फॉरेन डिस्ट्रक्टीव्ह आयडिओलॉजी, यापासून सावध राहण्याची गरज – मोदी

    देशात एक नवा एफडीआय, फॉरेन डिस्ट्रक्टीव्ह आयडिओलॉजी, यापासून सावध राहण्याची गरज

  • 08 Feb 2021 11:35 AM (IST)

    PM Narendra Modi on punjab and sikh : या देशाला शीखांचा अभिमान

    भारत अशांत कसा राहील यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत, फाळणी झाली तेव्हा सर्वाधिक पंजाबनं सहन केलं, 1984 च्या दंगलीत सर्वाधिक अश्रू पंजाबचे वाहिले, जम्मू काश्मीरमध्ये झाले, पूर्वोत्तर भारतात बॉम्ब दारु गोळे या सर्वांनी नुकसान आपलं झालं. याच्या मागे कोणत्या शक्ती आहेत, त्या जगाला माहिती आहेत. या सर्वांवर उपाय शोधून आपण पुढे जायला हवं. विशेषता पंजाब आणि शीख बांधवांच्या डोक्यात चुकीचे गोष्टी भरल्या जात आहेत. या देशाला प्रत्येक शीखाचा अभिमान आहे, त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी पंजाबची रोटी खाल्ली आहे, पंजाबी माणसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत

  • 08 Feb 2021 11:35 AM (IST)

    देशानं या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं – मोदी

    गेल्या काही काळापासून ह्या देशात नवी बिरादारी समोर आलीय, ती आहे, आंदोलनजीवी, कुठलेही आंदोलन असेल हे तिथं पोहोचतात, वकिलांचं असो, स्टुडंटसचं कुठेही आंदोलन असेल तिथं पोहोचतात, देशानं या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात, ज्यांचं ज्यांचं सरकार आहे त्या सगळ्यांना ह्या आंदोलनजीवी, परजीवींचा अनुभव येतो

  • 08 Feb 2021 11:34 AM (IST)

    काही लोक आहेत जे भारताला अस्थिर आणि अशांत करण्याच्या प्रयत्नात – मोदी

    भारताची ताकद अशा समस्या सोडवणे आणि त्यातून मार्ग काढत पुढे जाणे ही आहे, पण काही लोक आहेत जे भारताला अस्थिर आणि अशांत करण्याच्या प्रयत्नात आहे, पंजाबसोबत काय झालं हे विसरता येणार नाही, फाळणी झाली पंजाबनं सहन केलं, ८४ च्या दंगली झाल्या, पंजाबनं सहन केलं, काश्मीरमध्ये हत्याकांड घडलं, पंजाबला सहन करावं लागलं, हा देश प्रत्येक शीखाचा गर्व करतो, जी भाषा त्यांच्यासाठी वापरली जाते, ती चिंताजनक

  • 08 Feb 2021 11:30 AM (IST)

    20 हजार कोटी रुपये मत्स शेतीसाठी दिलेत – मोदी

    मत्य व्यवसायासाठी एक वेगळी मिनिस्ट्री,  20 हजार कोटी रुपये मत्स शेतीसाठी दिलेत,दूध, मत्स, मधमाशीपालनावर मोदींचा भर, स्वीट रिव्हॉल्युशन, सोलार पंपचा खर्च, अनेक पीकं घ्या,

  • 08 Feb 2021 11:29 AM (IST)

    आपण राजकारणात दंग राहू तर शेतकऱ्यांना अंधारात ढकलू – मोदी

    आपण उशिर करु, आपल्याच राजकारणात दंग राहू तर शेतकऱ्यांना अंधारात ढकलू

  • 08 Feb 2021 11:29 AM (IST)

    PM Narendra Modi on MSP and farmers protest: MSP होता, आहे आणि राहील

    आम्ही, कृषीमंत्री शेतकरी आंदोलकांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा सुरु आहेत, मिळून मिसळून चर्चा करु, वृद्ध शेतकऱ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये, आज मी संसदेतूनही आवाहन करतो, चर्चेने मार्ग काढू, तुम्हाला लोकशाहीत आंदोलनाचा हक्क आहे, आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचं आहे, मागे नाही. पक्ष-विपक्ष असो, या सुधारणांना आपण संधी द्यायला हवी, या परिवर्तनाने लाभ होतो की नाही हे पाहावं लागेल, काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा करु, आपण काही दरवाजे बंद करत नाहीत. मंडई अधिक प्रतिस्पर्धी होतील, लाभ होईल, msp होता, आहे आणि राहील. या सभागृहाच्या पवित्र्यातून आम्ही ही ग्वाही देतो.

    विश्वास ठेवा, बाजार समित्या, आडत्या अधिक सक्षम होतील, एमएसपी आहे, एमएसपी होता आणि एमएसपी राहील, स्वस्त राशन यापुढेही चालू राहील, आपण उशिर करु, आपल्याच राजकारणात दंग राहू तर शेतकऱ्यांना अंधारात ढकलूखोटारडेपणा पसरवू नका, 20 हजार कोटी रुपये मत्स शेतीसाठी दिलेत

  • 08 Feb 2021 11:27 AM (IST)

    एमएसपी आहे, एमएसपी होता आणि एमएसपी राहील – मोदी

    आपल्याला पुढे जायचंय, देशाला मागे घेऊन जाऊ नका, सुधारणांना एक संधी द्यायला हवी, काही चुका असतील तर दुरुस्त करु, विश्वास ठेवा, बाजार समित्या, आडत्या अधिक सक्षम होतील, एमएसपी आहे, एमएसपी होता आणि एमएसपी राहील

  • 08 Feb 2021 11:26 AM (IST)

    वाईट झालं तर माझ्या खात्यात, चांगुलपण तुमच्या खात्यात – मोदी

    कुठलेही सरकार असो ते बदल करत असतात, वाईट झालं तर माझ्या खात्यात, चांगुलपण तुमच्या खात्यात, कुणाला तरी हे करावंच लागेल, मी हे करतोय, आंदोलन करणं तुमचा हक्का, पण वृद्धांना घेऊन असं बसू नका, चर्चेला कधीही या, मोदींचं पुन्हा एकदा आंदोलनकर्त्यांना संसदेतून थेट आव्हान,

  • 08 Feb 2021 11:25 AM (IST)

    शेतीवरील समस्येवर आता उपाय शोधायची वेळ – मोदी

    शास्त्रींच्या काळात कुणी कृषी मंत्री व्हायला तयार नव्हते, सी सुब्रमण्यम यांना शेवटी शास्त्रींनी कृषी मंत्री केलं, डावे त्यावेळेसही म्हणत होते, हे अमेरिकेचे एजंट आहेत, तरीही शास्त्रींनी सुधारणा राबवल्या, शेतीत समस्या आहेत, हे मान्य करावंच लागेल, पण आता त्यावर उपाय शोधायची वेळ, कुठल्याही कायद्यात सुधारणा करत असतोत

  • 08 Feb 2021 11:25 AM (IST)

    PM Narendra Modi on Lal Bahadur Shastri : शास्त्रींच्या काळात कुणी कृषी मंत्री व्हायला तयार नव्हते

    8 लाख करोड रुपयांचा दूध उद्योग, लाल बहादूर शास्त्रींच्या काळात कुणी कृषी मंत्री व्हायला तयार नव्हते, सी सुब्रमण्यम यांना शेवटी शास्त्रींनी कृषी मंत्री केलं, डावे त्यावेळेसही म्हणत होते, हे अमेरिकेचे एजंट आहेत, तरीही शास्त्रींनी सुधारणा राबवल्या, शेतीत समस्या आहेत, हे मान्य करावंच लागेल, पण आता त्यावर उपाय शोधायची वेळ, कुठल्याही कायद्यात सुधारणा करत असतो, कुठलेही सरकार असो ते बदल करत असतात

  • 08 Feb 2021 11:23 AM (IST)

    PM Narendra Modi Live – कुटुंबात लग्न असतं त्यावेळेस आत्या नाराज होऊन म्हणतेच, मला कुठं बोलवलं

    आम्हाला विचारलं नाही म्हणणाऱ्यांची मोदींकडून फिरकी, कुटुंबात लग्न असतं त्यावेळेस आत्या नाराज होऊन म्हणतेच, मला कुठं बोलवलं

  • 08 Feb 2021 11:17 AM (IST)

    PM Narendra Modi on Sharad Pawar and Manmohan Singh : शरद पवारजींनी कृषी कायद्यातील सुधारणांवर भाष्य केलं

    आमचे आदरणीय शरद पवारजींनी कृषी कायद्यातील सुधारणांवर भाष्य केलं, शरद पवारांनी आताच सांगितलं, मी सुधारणांच्या बाजूने आहोत, आता अचानक राजकारणासाठी यू टर्न , त्यासाठी स्वत:चे विचार सोडले, मनमोहनसिंग यांची तरी गोष्ट लक्ष ठेवा, माझी नाही ठेवली तरी चालेल, तुम्हाला गर्व वाटायला हवा, मनमोहनसिंग यांनी जे म्हटलं ते मोदी करतायत – पंतप्रधान मोदी

  • 08 Feb 2021 11:17 AM (IST)

    मनमोहनसिंग यांनी जे म्हटलं ते मोदी करतायत, तुम्हाला गर्व वाटायला हवा – मोदी

    जे यू टर्न घेत आहेत त्यांनी मनमोहनसिंग यांची तरी गोष्ट लक्ष ठेवा, माझी नाही ठेवली तरी चालेल, “their are other rigidities because of the whole markets regime setup in the 1930’s which prevent our farmers from selling their produce where they get the higher rate of return. it is our intension to remove all those handicaps which come in the way of India, realizing its wast potential, at one large common market “, हे आदरणीय मनमोहन सिंहानी सांगितलं होतं, तेच काम आम्ही करतोय,  तुम्हाला गर्व वाटायला हवा, मनमोहनसिंग यांनी जे म्हटलं ते मोदी करतायत

  • 08 Feb 2021 11:16 AM (IST)

    अचानक राजकारणासाठी यू टर्न, मोदींचा शरद पवारांना टोला

    आमचे आदरणीय शरद पवारजी, कृषी सुधारणांची वकिली केलीय, शरद पवारांनी आताच सांगितलं, मी सुधारणांच्या बाजुने, आता अचानक राजकारणासाठी यू टर्न, त्यासाठी स्वत:चे विचार सोडले

  • 08 Feb 2021 11:14 AM (IST)

    PM Narendra Modi on Kisan credit card : छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली

    10 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ, बंगालचं राजकारण आडवं आलं नसतं तर हा आकडा मोठा असता, छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली, आम्ही पहिल्यांदाच किसान रेल्वे आणली, याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना,

  • 08 Feb 2021 11:13 AM (IST)

    आतापर्यंत १ लाख १५ हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात – मोदी

    पंतप्रधाीन सन्मान निधी योजनेअंतर्गत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात, दहा कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा, बंगालचे शेतकरी जर यात जोडले गेले असते तर हा आकडा मोठा असता, आतापर्यंत १ लाख १५ हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात,

  • 08 Feb 2021 11:13 AM (IST)

    PM Narendra Modi on farmers loan waiver : कर्जमाफी छोट्या शेतकऱ्यांसाठी नसतेच

    निवडणुका आल्या की कर्जमाफीची योजना राबवतो, कर्जमाफी छोट्या शेतकऱ्यांसाठी नसतेच, त्याचं बँकेत साधं खातं नसतं, कर्जमाफीचा फायदा कुठून मिळणार? त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी नाही कारण ते कर्ज घेतच नाहीत आम्ही किसान क्रेडिट कार्ड आणलं, ते आता पावने दोन कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. बंगालमध्ये राजकारण आडवं आलं, त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळालं नाही, अन्यथा सरकारी योजनेची व्याप्ती मोठी ठरली असती

  • 08 Feb 2021 11:12 AM (IST)

    पीक विमा योजनेअंतर्गत ९० हजार कोटी रुपयांचा क्लेम शेतकऱ्यांना मिळाला – मोदी

    २०१४ नंतर काही परिवर्तन केले, पीक विमा योजना वाढवली, जेणेकरुन छोटे शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकतील, गेल्या चार -पाच वर्षात पीक विमा योजनेअंतर्गत ९० हजार कोटी रुपयांचा क्लेम शेतकऱ्यांना मिळाला

  • 08 Feb 2021 11:08 AM (IST)

    कर्जमाफी छोट्या शेतकऱ्यांसाठी नसतेच – मोदी

    निवडणुका आल्या की कर्जमाफीची योजना राबवतो, कर्जमाफी छोट्या शेतकऱ्यांसाठी नसतेच, त्याचं बँकेत साधं खातं नसतं, कर्जमाफीचा फायदा कुठून मिळणार, त्यामुळे ही योजना त्यांच्यासाठी नाही कारण ते कर्ज घेतच नाहीत

  • 08 Feb 2021 11:08 AM (IST)

    PM Narendra Modi on farmers protest: सभागृहात सविस्तर चर्चा का नाही? शेतकरी आंदोलनावरुन मोदींचा सवाल

    शेतकरी आंदोलनाची खूप चर्चा झाली, सभागृहात सर्वात जास्त आंदोलनावर चर्चा झाली, मूळ गोष्टीवर विस्तृत चर्चा व्हायला हवी होती, आमच्या कृषीमंत्र्यांनी विस्तृत चर्चा केली, माजी पंतप्रधान देवेगौडांनी चर्चेला चांगला आकार दिला, मी आदरणीय देवेगौडांचा आभारी, त्यांनी कृषी कायद्यातील चांगल्या गोष्टींचं कौतुक केलं, काही सूचना केल्या. शेतीची मूळ समस्या काय आहेत? मी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा दाखला देतो, बहुतांश शेतकरी असे ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी जमीन, असे शेतकरी आता 61 टक्के आहेत, 86 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन, असे 12 कोटी शेतकरी आहेत, चौधरी चरणसिंग यांनी आपल्यासाठी हे प्रश्न सोडून गेलेत, निवडणुका आल्या की कर्जमाफीची योजना राबवतो

    निवडणुका आल्या की कर्जमाफी सुरु होते, ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी असते की मतांसाठी हा प्रश्न आहे. या कर्जमाफीचा छोट्या शेतकऱ्यांना फायदाच होत नाही –

  • 08 Feb 2021 11:05 AM (IST)

    शेतकरी आंदोलनाच्या मुळ गोष्टीवर विस्तृत चर्चा व्हायला हवी होती – मोदी

    किसान आंदोलनाची खूप चर्चा झाली, सभागृहात सर्वात जास्त आंदोलनावर चर्चा झाली, मुळ गोष्टीवर विस्तृत चर्चा व्हायला हवी होती, आमच्या कृषी मंत्र्यांनी विस्तृत चर्चा केली, देवेगौडांनी चर्चेला चांगला आकार दिला, मी आदरणीय देवेगौडाचा आभारी, शेतीची मुळ समस्या काय आहे, मी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचा दाखला देतो, बहुतांश शेतकरी असे ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा कमी जमीन, असे शेतकरी आता 61 टक्के आहेत, 86 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन, असे 12 कोटी शेतकरी आहेत जे आपली उपजिविका भागवू शकत नाही, चौधरी चरणसिंग यांनी आपल्यासाठी हे प्रश्न सोडून गेलेत

  • 08 Feb 2021 11:03 AM (IST)

    आपल्याला ठरवायचं आहे की, समस्यांचा भाग बनायचंय की उपायांचा – मोदी

    आपल्याला ठरवायचं आहे की, समस्यांचा भाग बनायचंय की उपायांचा, समस्यांचा भाग बनलं तर राजकारण होईल, उपायांचा भाग झालो तर राष्ट्रनिती आणखी चांगली होईल, वर्तमान आणि येणाऱ्या पिढीसाठीही विचार करायचा आहे,

  • 08 Feb 2021 11:03 AM (IST)

    PM Narendra Modi Live: देशात दहा कोटी शौचालय बांधले गेले

    दहा कोटी शौचालय बांधले गेले, दोन कोटी घरं बांधली गेली, पाच लाखापर्यंत गरिबांचा उपचार होतो, आपल्याला ठरवायचं आहे की, समस्यांचा भाग बनायचंय की उपायांचा, समस्यांचा भाग झालात तर राजकारण चालून जातं,

  • 08 Feb 2021 11:02 AM (IST)

    PM Narendra Modi on poverty : माझं सरकार गरिबांना समर्पित

    मी पहिल्याच भाषणात म्हणालो होतो, माझं सरकार गरिबांना समर्पित, यावरुन आम्ही कधीही हटणार नाही, आम्ही थांबणार नाही, आम्ही आणखी करत जाऊ, गरिबी निर्मूलन हे आमचं ध्येय आहे, मूलभूत गरजा पूर्ण करणं हे कर्तव्य आहे. गरिबाला एकदा आत्मविश्वास आला तर तो गरिबीला आव्हान देतो

  • 08 Feb 2021 11:01 AM (IST)

    गरिबांसाठी दोन कोटी घरं बांधली गेली – मोदी

    दहा कोटी शौचालय बांधले गेले, दोन कोटी घरं बांधली गेली, पाच लाखापर्यंत गरिबांचा उपचार होतो

  • 08 Feb 2021 11:00 AM (IST)

    देशाला गरिबीतून मुक्त व्हावंच लागेल  – मोदी

    माझ्या पहिल्या भाषणात मी म्हटलं होतं की आमचं सरकार गरिबांना समर्पित आहे, आणि आजही आमचा नारा तोच, देशाला गरिबीतून मुक्त व्हावंच लागेल, आता गरिबाला एकदा आत्मविश्वास आला तर तो गरिबीला आव्हान देतो

  • 08 Feb 2021 10:59 AM (IST)

    जल, थल, अंतरिक्ष असेल, भारत आपल्या संरक्षणासाठी उभा – मोदी

    जल, थल, अंतरिक्ष असेल, भारत आपल्या संरक्षणासाठी उभा, भारताची ताकद जगाने पाहिली आहे

  • 08 Feb 2021 10:59 AM (IST)

    PM Narendra Modi on Democracy: भारताची लोकशाही ही लोकशाहींची माता

    भारताची लोकशाही ही लोकशाहींची आई, आपण मुळातच लोकशाहीवादी आहोत, आणीबाणीच्या काळात मीडिया, न्यायपालिकेची काय स्थिती होती ते आठवा, संधी मिळताच लोकांनी लोकशाही पुन्हा स्थापित केली, मुद्दा हा नाही की कुणाचं सरकार होतं, आपल्याला लोकशाही मूल्ये लक्षात ठेऊन पुढं जायचंय

  • 08 Feb 2021 10:58 AM (IST)

    भारतात रेकॉर्डब्रेक गुंतवणूक होत आहे – मोदी

    कोरोना काळात जगातील लोकांना गुंतकणुकीसाठी पर्याय नाही, पण भारतात रेकॉर्डब्रेक गुंतवणूक होत आहे, कोरोना काळातही ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे,

  • 08 Feb 2021 10:56 AM (IST)

    भारताची लोकशाही ही लोकशाहींची आई, आपण मुळातच लोकशाहीवादी आहोत – मोदी

    भारताची लोकशाही ही लोकशाहींची आई, आपण मुळातच लोकशाहीवादी आहोत, आणीबाणीच्या काळात मीडिया, न्यायपालिकेची काय स्थिती होती ते आठवा, संधी मिळताच लोकांनी लोकशाही पुन्हा स्थापित केली,

  • 08 Feb 2021 10:54 AM (IST)

    PM Narendra Modi on Netaji Subhash Chandra bose : आपण नेताजींच्या आदर्शांना विसरलोत – मोदी

    आपली लोकशाही ही वेस्टर्न अर्थात पाश्चत्य नाही तर मानवतावादी आहे, भारताचा राष्ट्रवाद हा ना स्वार्थी, ना आक्रमक, भारताचा राष्ट्रवाद हा सत्यम, शिवम, सुंदर, हे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटलं होतं, पण आपण नेताजींच्या आदर्शांना विसरलोत – मोदी

  • 08 Feb 2021 10:53 AM (IST)

    आपली लोकशाही ही वेस्टर्न नाही तर मानवी – मोदी

    आपली लोकशाही कुठल्याही प्रकारे ही वेस्टर्न नाही तर मानवी आहे, भारताचा इतिहास लोकशाहीच्या उदाहरणांनी भरलेला आहे, आज देशवासियांना भारताच्या राष्ट्रवादावर होणाऱ्या हल्ल्यापासून सूचित करणे गरजेचं आहे,भारताचा राष्ट्रवाद हा ना स्वार्थी, आक्रमकभारताचा राष्ट्रवाद हा सत्यम, शिवम, सुंदर, हे नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटलं होतं, आज त्यांची १२५ वी जयंती आपण साजरी करत आहोत, पण आपण नेताजींच्या आदर्शांना विसरलोत

     

  • 08 Feb 2021 10:52 AM (IST)

    PM Narendra Modi on Mamata Banerjee : काँग्रेसने देशाची निराशा केली, आता तृणमूलही त्यांच्याच पंगतीत

    राज्यांना मी विशेष धन्यवाद देतो, संघराज्य पद्धती या कोरोनाकाळात मजबूत झाली, लोकशाहीवरून खूप उपदेश दिले गेले, भारताची लोकशाही अशी नाही की जिचे सालपटं काढली जातील, तृणमूल खासदार डेरेक ओ ब्रायन मोठमोठे शब्द वापरत होते, कळतच नव्हतं ते देशाबद्दल बोलतायत की बंगालबद्दल, मोदींचा ममता बॅनर्जींना अप्रत्यक्ष टोला, काँग्रेस देशाला निराश करते, त्यांच्या (तृणमूलच्या) सदस्यांनीही केलं – मोदी

  • 08 Feb 2021 10:51 AM (IST)

    मोदींचा ममता बॅनर्जींना टोला

    मोदींचा ममता बॅनर्जींना अप्रत्यक्ष टोला, काँग्रेस देशाला निराश करते, त्यांच्या सदस्यांनीही केलं

  • 08 Feb 2021 10:51 AM (IST)

    संघराज्य पद्धती या कोरोना काळात मजबूत झाली – मोदी

    केंद्र आणि राज्याने मिळून चांगलं केलं, राज्यांना मी विशेष धन्यवाद देतो, संघराज्य पद्धती या कोरोना काळात मजबूत झाली, लोकशाहीवरून खूप उपदेश दिले गेले, भारताची लोकशाही अशी नाही की जिचे सालपटं काढली जातील, डेरेक ओ ब्रायन मोठमोठे शब्द वापरत होते, कळतच नव्हतं देशाबद्दल बोलतायत की बंगाल बद्दल

  • 08 Feb 2021 10:49 AM (IST)

    PM Narendra Modi on Corona vaccine : जग अभिमानानं सांगतंय, आमच्याकडे भारताची वॅक्सिन

    ज्यांना थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून हिणवलं जात होतं, ते आता वॅक्सिन घेऊन आलेत, जगातला सर्वात मोठं लसीकरण आपल्या देशात होतंय, भारताचं हे सामर्थ्य कुठे पोहोचलं नाही? कोरोनाविरुद्धच्या प्रयत्नांनी देशाला जगात मान मिळून दिला, कोरोना काळात दीडशे देशात भारतीय औषधी पोहोचवली, जग अभिमानानं सांगतंय, आमच्याकडे भारताची वॅक्सिन आलीय

  • 08 Feb 2021 10:48 AM (IST)

    त्या संकटकाळातही दीडशे देशांना भारताने औषध पुरवलं – मोदी

    जेव्हा कोरोना काळात कुठलंही औषध नव्हतं तेव्हा जगाचं लक्ष भारताकडे होतं, त्या संकटकाळातही दीडशे देशांना भारताने औषध पुरवलं, इतकंच नाही लशीबाबतही आहे, जग मोठ्या अभिमानाने सांगतं की आमच्याकडे भारताची लस आली आहे, – मोदी

  • 08 Feb 2021 10:46 AM (IST)

    ज्यांना थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून हिणवलं जात होतं, ते आता वॅक्सिन घेऊन आलेत – मोदी

    ज्यांना थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणून हिणवलं जात होतं, ते आता वॅक्सिन घेऊन आलेत, जगातला सर्वात मोठं लसीकरण आपल्या देशात होतंय, भारताचं हे सामर्थ्य कुठे नाही पोहोचलं – मोदी

  • 08 Feb 2021 10:45 AM (IST)

    PM Narendra Modi Live : जिथं देशाचा अपमान होईल अशा विरोधात पडू नका : मोदी

    जिथं देशाचा अपमान होईल अशा विरोधात पडू नका , देशाचं नुकसान का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांना सवाल, कोरोना वॉरियर्सचं भर संसदेत कौतुक, कोरोना वॉरियर्सचा आदर केला पाहिजे, अपमान नाही

  • 08 Feb 2021 10:45 AM (IST)

    कोरोना वॉरिअर्स यांच्या प्रयत्नांना यश – मोदी

    कोरोना वॉरिअर्सने अनेक भीषण परिस्थितीत आपलं कर्तव्य निभावलं, त्यांच्या प्रयत्नांना विसरायला नको, कोरोना वॉरिअर्स यांच्या प्रयत्नांना यश – मोदी

  • 08 Feb 2021 10:44 AM (IST)

    झोपड्याबाहेर एक वृद्ध महिला दीवा लावून भारतासाठी दिवा लावला आणि तुम्ही त्याची खिल्ली उडवता

    झोपड्याबाहेर एक वृद्ध महिला दीवा लावून भारतासाठी दिवा लावला आणि तुम्ही त्याची खिल्ली उडवता, त्या महिनेने तिच्यातील शक्ती दाखवली, मात्र, त्याची खिल्ली उडवण्यात मजदा .येत आहे

  • 08 Feb 2021 10:41 AM (IST)

    अरे भारत आत्मनिर्भरता के पथपर दौड… : मोदी

    अवसर तेरे लिए खडा है, तू आत्मविश्वास से भरा पडा है, हर बाधा, हर बंदीश को तोड, अरे भारत आत्मनिर्भरता के पथपर दौड, मोदींकडून 21 व्या शतकातील, वर्तमान काळातील परिस्थितीवरुन कवितेचं वर्णन

  • 08 Feb 2021 10:41 AM (IST)

    PM Narendra Modi Live : अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चुपचाप पडा है

    राष्ट्रपतीचं भाषण सर्वांनी ऐकलं असतं तर बरं झालं असतं, राष्ट्रपतींचं भाषण न ऐकताही सर्वांपर्यंत पोहोचलं म्हणून एवढं बोलू शकले असते, संसदेत हजर न राहता भाषणावर टीका करणाऱ्यांना मोदींचा टोला

    अनेक संधी भारतासाठी वाट बघतायत, जो देश तरुण आहे, तो देश अशा संधी जाऊ नाही देणार, आपण स्वातंत्र्यांची 75 वर्षे पूर्ण करतोयत, हे प्रेरणेचं पर्व व्हावं

    देशाच्या शतकोत्सवाचा विचार करायला हवा, जगाला वाटतं की हे भारत करु शकला तर जगाच्या समस्या सुटतील

    अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चुपचाप पडा है, तेरा कर्मक्षेत्र बडा है, पलपल है अनमोल, अरे भारत उठ, आँखे खोल, मैथिली शरण गुप्त यांची कविता मोदींकडून संसदेत सादर

    अवसर तेरे लिए खडा है, तू आत्मविश्वास से भरा पडा है, हर बाधा, हर बंदीश को तोड, अरे भारत आत्मनिर्भरता के पथपर दौड

  • 08 Feb 2021 10:40 AM (IST)

    अवसर तेरे लिए खडा है…., मैथिली शरण गुप्त यांची कविता मोदींकडून संसदेत सादर

    अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चुपचाप पडा है, तेरा कर्मक्षेत्र बडा है, पलपल है अनमोल, अरे भारत उठ, आँखे खोल, मैथिली शरण गुप्त यांची कविता मोदींकडून संसदेत,

  • 08 Feb 2021 10:39 AM (IST)

    अनेक संधी भारतासाठी वाट बघतायत : मोदी

    अनेक संधी भारतासाठी वाट बघतायत, जो देश तरुण आहे, तो देश अशा संधी जाऊ नाही देणार, आपण स्वातंत्र्यांची 75 वर्षे पूर्ण करतोयत, हे प्रेरणेचं पर्व व्हावं, देशाच्या शतकोत्सवाचा विचार करायला हवा, जगाला वाटतं की हे भारत करु शकला तर जगाच्या समस्या सुटतील

  • 08 Feb 2021 10:38 AM (IST)

    मोदींचं भाषण सुरु, संसदेत हजर न रहाता भाषणावर टीका करणाऱ्यांना मोदींचा टोला

    राष्ट्रपतीचं भाषण सर्वांनी ऐकलं असतं तर बरं झालं असतं, राष्ट्रपतींचं भाषण न ऐकताही सर्वांपर्यंत पोहोचलं म्हणून एवढं बोलू शकले असते,

  • 08 Feb 2021 10:38 AM (IST)

    PM Narendra Modi Live : आपण स्वातंत्र्याचं 75 वर्ष साजरं करत आहोत

    आपण स्वातंत्र्याचं 75 वर्ष साजरं करत आहोत, हे आपण प्रेरणेचं पर्व साजरं करायला हवं, देश जेव्हा स्वातंत्र्याचा उत्साह साजरा करत असेल, तेव्हा आपण कोणत्या स्थानावर असेल याचा सातत्याने विचार करायला हवा.

  • 08 Feb 2021 10:13 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देतील

    पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडे दहाच्या सुमारास राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली

  • 08 Feb 2021 10:10 AM (IST)

    राज्यसभेची कारवाई सुरु

    राज्यसभेची कारवाई सुरु झाली आहे, तीन नवीन कृषी कायदे आणि त्याविरोधातील शेतकऱ्याच्या आंदोलनाबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळ सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत बोलणार आहे.