Parliament Session PM Narendra Modi LIVE | शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं : पंतप्रधान मोदी

| Updated on: Feb 10, 2021 | 8:05 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील भाषण (Parliament Session PM Narendra Modi LIVE)

Parliament Session PM Narendra Modi LIVE | शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम आंदोलनजीवींनी केलं : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (बुधवारी 10 फेब्रुवारी) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर करत आहेत. (Parliament Session PM Narendra  Modi LIVE)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Feb 2021 05:52 PM (IST)

    मोदींचं शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेसाठी आवाहन

    काहीही बदलणार नाही, ही मानसिकता बदलली पाहिजे. जर अनेक समस्या आहेत. तर त्यावर उपायही आहेत. ज्यांना राजकीय अजेंडा आहे, त्यांना राजकारण करु द्या. मी पुन्हा एकदा देशातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की या आपण पुन्हा एकदा यावर चर्चा करु : पंतप्रधान मोदी

  • 10 Feb 2021 05:38 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं : पंतप्रधान मोदी

    शेतकरी गरिबीत चाचपडत राहो, असे कोणालाही वाटत नाही. देशाचं सामर्थ्य वाढवण्यात सर्वांचे योगदान, या देशभरात टोल प्लाझा ही सर्वांनी स्विकारलं आहे. सर्व राज्यात टोल प्लाझा आहे. शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं : पंतप्रधान मोदी


  • 10 Feb 2021 05:33 PM (IST)

    शरद पवारांनी युटर्न घेतला : पंतप्रधान मोदी

    कृषी कायद्याच्या बाजूने शरद पवार आधी बोलले, आता त्यांनी युटर्न घेतला : पंतप्रधान मोदी

  • 10 Feb 2021 05:15 PM (IST)

    मोदींकडून चर्चिलला सिगारेट पाठवायची जबाबदारी असणाऱ्या गोष्टीचा सभागृहात पुन्हा उल्लेख

    मोदींकडून चर्चिलला सिगारेट पाठवायची जबाबदारी असणाऱ्या गोष्टीचा सभागृहात पुन्हा उल्लेख, स्थिती जैसे थे ठेवण्याची पद्धत किती चुकीची आहे हे सांगण्यासाठी चर्चिलचं उदाहरण

  • 10 Feb 2021 05:07 PM (IST)

    शेतमालाची जुनी व्यवस्था संपलेली नाही : पंतप्रधान मोदी

    साचलेलं पाणी रोगराई आणतं, वाहणारं पाणी आयुष्य फुलवतं, शेतमालाची जुनी व्यवस्था संपलेली नाही, ज्यांना हवी ते वापरु शकता

  • 10 Feb 2021 05:06 PM (IST)

    काँग्रेसची दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका : पंतप्रधान मोदी 

    काँग्रेसचे राज्यसभेतले सदस्य हे चर्चा करतात, वादविवाद करतात, लोकसभेतले खासदार दुसरंच करतात : पंतप्रधान मोदी

  • 10 Feb 2021 05:03 PM (IST)

    मोदींनी टिका करताच काँग्रेसचा सभागृहातून वॉकआऊट

    काँग्रेसची राज्यसभेत एक भूमिका, तर लोकसभेत दुसरी भूमिका, इतकी विभागलेली आणि संभ्रमित पार्टी मी कधी पाहिली नाही. सर्वात जुनी पार्टी पण सर्वात संभ्रमित असलेली पार्टी काँग्रेस, मोदींची काँग्रेसवर कडवट टीका.

  • 10 Feb 2021 05:00 PM (IST)

    सगळे कायदे हे प्रगतशील समाजासाठी आवश्यक : पंतप्रधान मोदी 

    बऱ्याच जणांची तक्रार आहे की आम्ही मागितले नव्हते हे कायदे  का आणले? पण कुणी हुंडाबंदीविरोधी कायदा मागितला नव्हता पण प्रगतशिल समाजासाठी आवश्यक, शिक्षण, मुलींना संपत्तीत अधिकार, ट्रिपल तलाकविरोधी कायदा कुणी मागितले नव्हते पण आणले, कारण हे सगळे कायदे हे प्रगतशील समाजासाठी आवश्यक : पंतप्रधान मोदी

  • 10 Feb 2021 04:57 PM (IST)

    माझ्या भाषणानं काँग्रेस उघडी पडेल अशी भीती : पंतप्रधान मोदी

    आता फार झालं, अधीर रंजनजी आता हे योग्य नाही. मी तुमचा आदर करतो, असे प्रत्युत्तर मोदींनी चौधरींना दिले. माझ्या भाषणानं काँग्रेस उघडी पडेल अशी भीती : पंतप्रधान मोदी

  • 10 Feb 2021 04:53 PM (IST)

    उलट शेतकऱ्यांना एक नवा पर्याय मिळाला आहे : पंतप्रधान मोदी

    माझ्या भाषणात अडथळा आणण्याची हे तर विरोधकांचं नियोजन आहे. मी कुणालाही विचारतो, तुमचा एक तरी जुना अधिकार हिरावला गेलाय का? उलट एक नवा पर्याय शेतकऱ्यांना मिळाला आहे. उलट शेतकऱ्याला जिथं हवं तिथं विकण्याची संधी मिळाली आहे, भीती घालण्याचं काम आंदोलनजीवी करतात : पंतप्रधान मोदी

  • 10 Feb 2021 04:46 PM (IST)

    आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा सरकारला आदर : पंतप्रधान मोदी 

    आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा सरकार आदर करतं. हे सभागृह आदर करतं, हे सरकारही करतं. कायदा लागू झाल्यानंतरही कुठेही ना बाजारपेठा बंद झाल्या ना एमएसपी बंद झाली, उलट एमएसपी वाढलीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • 10 Feb 2021 04:41 PM (IST)

    कृषी क्षेत्रात सुधारणा आणणारे कायदे आणले : पंतप्रधान मोदी

    कोरोना काळातच तीन कृषी कायदे आणले. कृषी क्षेत्रात सुधारणा आणणारे कायदे आणले, बरं झालं असतं, काँग्रेसचे खासदार कायद्याच्या कंटेटवर बोलले असते. ते कायदा काळा आहे की पांढरा यावरच बोलत गेले : पंतप्रधान मोदी

  • 10 Feb 2021 04:38 PM (IST)

    आधार, जनधन गरिबांच्या कामाला आलं : पंतप्रधान मोदी 

    75 कोटीपेक्षा जास्त भारतीयांना रेशन पोहोचवलं. 2 लाख कोटी रुपये लोकांपर्यंत पोहोचवले. आधार, जनधन गरिबांच्या कामाला आलं : पंतप्रधान मोदी

  • 10 Feb 2021 04:36 PM (IST)

    कोरोना काळात डॉक्टर, नर्स, सफाई कामगार देवाच्या रुपात आले, म्हणून आपण जिंकलो : पंतप्रधान मोदी

    डॉक्टर, नर्स हे देवाच्या रुपात आले. पंधरा पंधरा दिवस ते घरी आले नाहीत. आपण कोरोनाविरोधात जिंकलो कारण आपले सफाई कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत होते. सफाई कामगार हे देवाच्या रुपात आले होते. रुग्णवाहिकेचा चालक हा देवाच्या रुपात आला होता

  • 10 Feb 2021 04:33 PM (IST)

    कोरोनानंतरचा काळ भारताला संधी निर्माण करणारा : पंतप्रधान मोदी  

    भारताची ओळख बनवण्याची ही संधी आहे. कोरोनानंतरचा काळ भारताला संधी निर्माण करणारा आहे, आपण एका कोपऱ्यात राहू आणि जगाला म्हणू आम्हाला स्वीकारा तर कसं चालेल : पंतप्रधान मोदी

  • 10 Feb 2021 04:32 PM (IST)

    देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात लोकल फॉर व्होकलचा नारा : पंतप्रधान मोदी  

    देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात लोकल फॉर व्होकलचा नारा ऐकायला येतो आहे. जे काही बदल करायचे आहेत, ते याचसाठी व्हायला हवेत : पंतप्रधान मोदी

  • 10 Feb 2021 04:30 PM (IST)

    आत्मनिर्भर भारत हाच नारा हवा : पंतप्रधान मोदी

    नवी जागतिक व्यवस्था उदयाला येताना दिसतेय. आपल्याला त्यात आपली जागा शोधायचीय. भारत या जगापासून वेगळा राहू शकत नाही. फक्त लोकसंख्येच्या ताकदीवर आपण जागा बनवू शकत नाही. ती जागा घ्यायची असेल तर आत्मनिर्भर भारत हाच नारा हवा. हा कुठल्याही नेत्याचा विचार नाही : पंतप्रधान मोदी

  • 10 Feb 2021 04:28 PM (IST)

    कोरोना काळानंतरही एक नवं जग तयार होतं आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी  

    सैन्य नाही, सहयोग हा मंत्र मजबूत होत गेला. यूएनची निर्मिती झाली, संस्था उदयाला आल्या. जगात कुणीही शांततेची चर्चा करायला लागला. त्या शांततेच्या चर्चेच्या काळातही सैन्यशक्ती वाढवायला लागले. छोटेमोठे देशही लष्करी बळ वाढवायला लागले. कोरोना काळानंतरही एक नवं जग तयार होतं आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • 10 Feb 2021 04:26 PM (IST)

    महायुद्धानंतर एक नवं जग उदयाला आलं : पंतप्रधान मोदी

    देशानं आपली परंपरा, संस्कृती, उद्देश सगळं शाबूत ठेवलं. एवढी विविधता असतानाही लक्ष्य पूर्ण केलं.प्रत्येक राष्ट्राला एक संदेश असतो, जो त्यानं द्यायचा असतो, एक मिशन असतं, त्यानं ते पूर्ण करायचं असतं, असं स्वामी विवेकानंद म्हणायचे. दोन महायुद्धानं जग निराश झालेलं होतं. महायुद्धानंतर एक नवं जग उदयाला आलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • 10 Feb 2021 04:23 PM (IST)

    हा क्षण गर्वाचा आणि पुढे जाण्याच्या पर्वाचा : पंतप्रधान मोदी

    भारत आता स्वातंत्र्यांची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करतो आहे. हा क्षण गर्वाचा आणि पुढे जाण्याच्या पर्वाचा आहे. जेव्हा देश स्वातंत्र्यांचा शतकोत्सव साजरा करेल, त्यावेळेस हे आताचं काम कामाला येणार आहे. भारत हा काही देशांचा महाद्विप आहे, असं शेवटचे ब्रिटीश गव्हर्नर म्हणायचे. याला कुणी एक राष्ट्र करु शकणार नाही असेही म्हणायचे.देशानं तो विचार खोटा ठरवला

  • 10 Feb 2021 04:20 PM (IST)

    महिला खासदारांच्या भाषणाने सभागृह समृद्ध – पंतप्रधान मोदी

    लोकसभेत पंधरा तासापर्यंत चर्चा केलीय. मध्यरात्रीपर्यंत त्यावर चर्चा झालीय. चर्चेत भाग घेणाऱ्या सर्व सदस्यांचा आभार व्यक्त करतो. विशेषत: महिला खासदारांचा आभार व्यक्त करतो. महिलांच्या भाषणात रिसर्च होता, धार होती, महिला खासदारांच्या भाषणाने सभागृह समृद्ध केलं आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • 10 Feb 2021 04:19 PM (IST)

    राष्ट्रपतींचं भाषण देशवासियांसाठी प्रेरणादायी – पंतप्रधान मोदी

    मी राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलण्यासाठी उभा आहे. राष्ट्रपतींचं भाषण हे 130 कोटी भारतीयांचा संकल्प आहे. संकट काळात देश कसा पुढे जातो हे राष्ट्रपतींनी भाषणात सांगितला. राष्ट्रपतींचं भाषण देशवासियांसाठी प्रेरणादायी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • 10 Feb 2021 04:03 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत संबोधन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर करणार आहेत. साधारण 4 वाजता पंतप्रधान मोदी लोकसभेत भाषण करतील.