नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : भारतीय रेल्वेचा (railway journey) प्रवास हा केवळ प्रवासच नव्हे तर आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव असतो. कधीकधी या प्रवासात कडू-गोड अनुभवही येतात. शुक्रवारी जे प्रवासी आनंद विहार येथून गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव ट्रेनमध्ये बसले, त्यांच्यासाठी हा अनुभव थोडा कटू होता. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल ते उत्तर प्रदेशातील गाझीपूर पर्यंत जाणारी सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस तिच्या नेहमीच्या वेळेनुसार आनंद विहार येथून रवाना झाली.
मात्र ट्रेन पुढे गेली असता थोड्याच वेळात ट्रेनमधील दोन कोचमधील वीजच गेली. पॉवर फेल्युअर (power cut) झाल्यामुळे AC सुद्धा बंद पडला आणि उकाड्यामुळे लोकांची चिडचिड, राग आणखीनच वाढला. वाढत्या उकाड्यामुळे कोचमधील लहान मुलं आणि महिलांचा त्रास वाढला. B1 और B2 कोचमधील प्रवासी गरमीमुळे चिडले होते, तेवढ्यात त्यांना ट्रेनचा तिकीट चेकर (TTE) दिसला. मग काय, प्रवाशांनी त्याला सरळ धारेवर धरलं , सगळा राग त्याच्यावरच निघाला. पॉवर कटमुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी तिकीट चेकरला सरळ टॉयलेटमध्येच कोंडले
हे प्रकरण वाढताच रेल्वेचे कर्मचारी आणि रेल्वे पोलीस दलाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा हा प्रकार वाढत गेल्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत रेल्वेच्या दोन डब्यातील वीजपुरवठा तातडीने दुरुस्त करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना दिली.
VIDEO | Due to a power failure in B1 and B2 coaches, the angry passengers created a ruckus and locked the TTE in the toilet in the Suhaildev Superfast Express going from Anand Vihar Terminal to Ghazipur on Friday. Soon after the departure of the train from Anand Vihar Terminal,… pic.twitter.com/cr1pIk5KSX
— Press Trust of India (@PTI_News) August 11, 2023
रात्री सुमारे 1 च्या सुमारास ट्रेन टुंडला रेल्वे स्टेशनवर पोहोचली असता, इंजिनिअर्सच्या टीमने ट्रेनच्या कोचमधील पॉवर कटचे कारण शोधण्यास सुरूवात केली. काही वेळानंतर B1 कोचमधील पॉवर कटची समस्या सोडवण्यात यश मिळाले. त्यानंतर B2 कोचमध्येही वीज पुन्हा आली आणि ट्रेन पुढल्या प्रवासासाठी रवाना झाली.
सुहेलदेव सुपरफास्ट ट्रेनमधील हा बिघाड आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल ट्रेनमधील प्रवाशांनी ट्विट करून आपल्या समस्या नोंदवल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा दुरूस्त करण्यासाठी टुंडला रेल्वे स्थानकावर ट्रेन २ तासांहून अधिक काळ उभी होती. आधीच उशिराने धावणाऱ्या या गाडीला वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आणखी उशीर झाला. आता ही ट्रेन जवळपास 5 तास उशिराने धावत आहे.